कारच्या धडकेत बाइकस्वाराचा नदीत पडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 06:36 IST2019-05-17T06:34:56+5:302019-05-17T06:36:00+5:30

पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत काही नागरिकांनी नदीपात्रात उतरून कृष्णा अरगुटलेवारचा मृतदेह बाहेर काढला.

youth falls into the river by the car accident | कारच्या धडकेत बाइकस्वाराचा नदीत पडून मृत्यू 

कारच्या धडकेत बाइकस्वाराचा नदीत पडून मृत्यू 

कामठी  : नागपूर नजीकच्या कन्हान नदीच्या पुलावर कार आणि बाइकचा अपघात झाला. कारच्या धडकेत बाइकस्वार कृष्णा अरगुटलेवार (26) रा. मच्छिपुरा कामठी हा नदीपात्रात फेकल्या गेला. यात त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. 
नागपूरहुन कन्हान कडे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक एम.एच.31 सीएस 2996 ची कन्हान येथून कामठी कडे येणाऱ्या बाइकचा क्रमांक एम.एच. 40 ए.एल. 8763 ची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बाइकस्वार कृष्णा अरगुटलेवार नदीच्या पात्रात फेकल्या गेला. अपघात जुनी कामठीच्या कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. यामुळे दोन्ही बाजूच्या पोलिसांत सम्रभ निर्माण झाल्याने घटनास्थळी पोहोचण्यात पोलिसांना एक तास उशीर झाला. यामुळे स्थनिक नागरिकांनी पोलीस प्राशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली.

पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत काही नागरिकांनी नदीपात्रात उतरून कृष्णा अरगुटलेवारचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या जुनी कामठी पोलिसांनी रात्री एक वाजता कामठी येथील उप जिल्हा रुग्णालयात कृष्णा अरगुटलेवारचा मृतदेह रवाना केला. रुग्णालयात मृताचे नातेवाईक आणि स्थनिक नागरिकांनी पोलिसांविरुद्ध नारेबाजी केली आणि कार चालकाला ताब्यात घेण्याची मागणी केली.

Web Title: youth falls into the river by the car accident

टॅग्स :Accidentअपघात