नागपुरात महागाई विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:39 IST2018-05-24T16:39:14+5:302018-05-24T16:39:26+5:30
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढवून भाजप सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला.

नागपुरात महागाई विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढवून भाजप सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला.
या आंदोलनात अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आ. अशोक धावड, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, कृष्ण कुमार पांडे, नितीन कुंभलकर, जुल्फिकार अहमद भुट्टो, किशोर जिचकार, दिनेश यादव,आयशा उईके, दीपक कापसे, कांता पराते, विजय बाबरे, श्रीकांत केकडे, रामाजी उईके, नरु जिचकार, सुरेश पाटील, कुणाल राऊत आदी सहभागी झाले. भाजपाने निवडणुकीपूर्वी जनतेला खोटी आश्वासने देत मोठमोठी स्वप्न दाखविली.
मात्र, निवडणुकीनंतर एकही आश्वासन पाळले नाही. सातत्याने इंधन दरवाढ करून सामान्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकार पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावून जनतेची लूट करीत आहे. या लुटारू सरकारला जनता नक्कीच धका शिकवेल, असा विश्वास यावेळी नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी रिकामे गॅस सिलेंडर घेऊन ठाण मांडले. महागाईमुळे गृहिणी त्रस्त असल्याचे सांगत महिलाशक्ती भाजपाला हद्दपार करेल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी भाजपा विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात आशिष मंडपे, कुणाल राऊत, धीरज पांडे,अजीत सिंह, नीलेश चन्द्रिकापुरे, अभिषेक सिंग, सदाब खान, राकेश निकोसे, आमिर नूरी, पंकज सावरकर, ऋषी कोचर, रिजवान खान रूमी, इंद्रसेन ठाकुर, बेबी गोरीकर, प्रकाश वानखेडे, जावेद खान, शेर सिंह पवार, विजय चिटमिटवार, सुनंदा राऊत, प्रकाश सदुण्के, ताराचंद चरडे, सुबोध कच्कलवर, चंदू वाकोडीकर, राजेश बालखेड़े, रमेश काकडे, दिलीप घोरपडे, सुनील नंदूकार, धीरज दहके, चेतन तरारे, सचिन वासनिक, राम यादव, शारदा सुफी, अनिरुद्ध पांडे, अविनाश फोड़े, फरमान अली, सुनील अवडे, मोतीराम गुप्ता, संतोष खडसे, अभिजित मेश्राम आदींनी भाग घेतला.