शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीला कळू न देता केलेल्या ‘दुसऱ्या लग्नाची गोष्ट’, ऐशोआरामासाठी मुंबईच्या प्राध्यापिकेला फसविणारा गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 08:51 IST

कौटुंबिक कारणामुळे पारुलचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला. ती एकटीच मुंबईत राहत होती. पारुलबाबत माहिती कळताच कमलेशने तिला फसविण्याची योजना तयार केली.

नागपूर : कंपनीत एकत्र काम करताना झालेल्या परिचयाचा फायदा घेऊन नागपुरातील एका बेरोजगार तरुणाने मुंबईतील प्राध्यापक तरुणीसोबत दुसरे लग्न करून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.कमलेश अशोक राऊत (३३) रा. विश्वकर्मानगर गल्ली नं. १० अजनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कमलेश आणि पीडित ३५ वर्षीय पारुल (बदललेले नाव) मिहानच्या एका कंपनीत काम करीत होते. पारुल तेथे अधिकारी होती. तर कमलेश ड्रायव्हर होता. त्यानंतर मुंबईच्या एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लागल्यामुळे पारुल मुंबईला गेली. दरम्यान कमलेश बेरोजगार झाला. कौटुंबिक कारणामुळे पारुलचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला. ती एकटीच मुंबईत राहत होती. पारुलबाबत माहिती कळताच कमलेशने तिला फसविण्याची योजना तयार केली. त्याने पारुलची भेट घेऊन आपण विद्युत विभागात कर्मचारी असल्याचे सांगितले अन् लग्नाचा प्रस्ताव तिच्या समोर ठेवला. घटस्फोटित असल्यामुळे आणि कमलेश अविवाहित असल्याचे पाहून तिने लग्नासाठी होकार दिला. त्यांनी जून २०१९ मध्ये जगनाडे चौकातील गायत्री मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्न केले. दोघेही मुंबईला गेले. कमलेशने संपत्ती खरेदी करण्याच्या नावाखाली पारुलकडून ६.६७ लाख रुपये घेतले आणि तो विमान प्रवास आणि दुसरे शौक करू लागला. 

पहिल्या लग्नाचा भांडाफोड झालालॉकडाऊनमुळे कॉलेज बंद झाले पारुल नागपूरला आईवडिलांकडे आली. कमलेशही नागपूरला आला. मुंबईला जाण्याचे कारण सांगून १.९५ लाखाचे दागिने घेऊन निघून गेला. काही दिवसानंतर पारुलला कमलेशच्या वागणुकीत बदल झाल्याचे लक्षात आले. तिने मित्राला फोन करून त्याची पुष्टी करण्याबाबत सांगितले. त्याने कमलेश मुंबईत नसल्याचे सांगितले.  पारुल सतर्क झाली. कमलेशच्या घरी गेल्यानंतर तिने त्याला पत्नी आणि मुलांसोबत रंगेहात पकडले. पहिल्या पत्नीनेही तो ऐशोआरामाचा शौकिन असल्याचे सांगितले. त्यानंतर पारुलने कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईnagpurनागपूर