नागपुरात मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:56 IST2018-12-15T20:53:52+5:302018-12-15T20:56:39+5:30

मोकाट कुत्र्यांनी महेंद्रनगरात एका तरुणाचा बळी घेतला. दुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे कुणाल कृष्णाजी अडकिने (वय २३, रा. बाळूनगर, बिनाकी लेआऊट) या तरुणाचा मृत्यू झाला.

A youth become victim of Stray dogs in Nagpur | नागपुरात मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी

नागपुरात मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी

ठळक मुद्देदुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी विजेच्या खांबाला धडकली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोकाट कुत्र्यांनी महेंद्रनगरात एका तरुणाचा बळी घेतला. दुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे कुणाल कृष्णाजी अडकिने (वय २३, रा. बाळूनगर, बिनाकी लेआऊट) या तरुणाचा मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यात रात्री १२.३० च्या सुमारास कुणाल आपले काम आटोपून मित्रासोबत दुचाकीने घराकडे जात होता. महेंद्रनगरातील विद्यासागर शाळेजवळ मोकाट कुत्री बसून होती. कुणालने त्यांच्या बाजूने दुचाकी काढताच कुत्र्यांचे टोळके जोरजोरात भुंकत त्याच्या मागे लागले. घाबरलेल्या कुणालने कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्यासाठी दुचाकीची गती वाढविली. त्यात तो मागे फिरून कुत्र्याकडे बघत असताना त्याची दुचाकी चौकातील खांबावर धडकली. त्यामुळे कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला आधी मेयोत आणि नंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याला शुक्रवारी दुपारी डॉक्टरांनी मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून पाचपावली पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या खासकरून दुचाकी चालकांच्या मागे लागणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

 

Web Title: A youth become victim of Stray dogs in Nagpur