शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रेमातील त्रिकोणामुळे युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:54 IST

प्रियकराने दुसऱ्या युवतीसोबत सूत जुळविल्याचे समजल्याने एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला प्रियकराची दगाबाजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देप्रियकरावर आरोप : धंतोलीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रियकराने दुसऱ्या युवतीसोबत सूत जुळविल्याचे समजल्याने एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला प्रियकराची दगाबाजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सम्यक मेश्राम (वय २०) असे आरोपी प्रियकराचे नाव असून, त्याच्या दगाबाजीमुळे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव अश्विनी ऊर्फ मोनिका काशीनाथ बोरीकर (वय २०) आहे.धंतोलीच्या राहुल नगरात राहणारी अश्विनी ऊर्फ मोनिका बोरीकर हिने २९ मार्चला दुपारी २.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी मोनिकाच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी चौकशी केली असता तिचे गेल्या काही महिन्यांपासून भिलगाव, कामठी येथील आरोपी सम्यक मेश्राम सोबत प्रेमसंबंध असल्याचे पुढे आले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सम्यकने दुसऱ्या एका युवतीला आपल्या जाळ्यात ओढले. सम्यकने आपल्याला अंधारात ठेवून दुसऱ्या युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू केल्याचे कळल्याने मोनिका कमालीची दुखावली होती. तिने त्याला त्या युवतीसोबत बोलण्यास मनाई केली होती. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी सम्यकने तिला उलटसुलट बोलून तिचे मन दुखवले. एवढेच नव्हे तर तिच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून नको तसे मेसेज पाठवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्याचमुळे मोनिकाने गळफास लावून स्वत:ला संपविल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले. परिणामी मोनिकाचा भाऊ तुषार काशीनाथ बोरीकर (वय २३) याची तक्रार नोंदवून घेत धंतोली पोलिसांनी आरोपी सम्यक मेश्रामविरुद्ध कलम ३०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट