शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात युवती ठार, युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात माेटरसायकलवर मागे बसलेली मैत्रीण उसळल्याने खाली काेसळली व ट्रकच्या चाकाखाली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात माेटरसायकलवर मागे बसलेली मैत्रीण उसळल्याने खाली काेसळली व ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-मनसर मार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

स्नेहा अजय मेश्राम (१५, रा. गल्ली क्रमांक-९, इंदिरानगर, जरीपटका, नागपूर) असे मृत मुलीचे तर आकाश ईश्वर सहारे (१९, रा. गल्ली क्रमांक- ५, कस्तुरबा नगर, नागपूर) असे जखमीचे नाव आहे. दाेघांची मैत्री असल्याने ते रविवारी दुपारी एमएच-४९/डीजी-८५५५ क्रमांकाच्या माेटरसायकलने रामटेक परिसरात फिरायला आले हाेते. आकाश माेटरसायकल चालवित हाेता तर स्नेहा मागे बसली हाेती.

ते मनसरहून रामटेकच्या दिशेने येत असताना या मार्गावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ येताच आकाशने समाेर असलेल्या एमएच-४०/बीजी-९६१५ क्रमांकाच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दाेन्ही वाहने समांतर येताच ताेल गेल्याने स्नेहा खाली काेसळली व वेगात असलेल्या ट्रकच्या चाकाखाली आली. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, धक्क्याने आकाश बाजूला पडल्याने ताेही जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून आकाशला उपचारासाठी तर स्नेहाचा मृतदेह उत्तरीय तपाणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणला. आकाशवर रामटेक शहरात उपचार सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शिवाजी बाेरकर करीत आहेत.