हल्ल्याच्या धाकाने पळालेल्या तरुणाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:20 IST2020-12-29T00:18:09+5:302020-12-29T00:20:06+5:30
Accident, death मारहाण होईल या भीतीने पळून जात असलेल्या एका तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले. कामठी मार्गावरील तिरपुडे कॉलेजजवळ रविवारी रात्री हा भीषण अपघात घडला. प्रकाश

हल्ल्याच्या धाकाने पळालेल्या तरुणाला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मारहाण होईल या भीतीने पळून जात असलेल्या एका तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले. कामठी मार्गावरील तिरपुडे कॉलेजजवळ रविवारी रात्री हा भीषण अपघात घडला. प्रकाश
संजय कोंदर्लीकर (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो नवीन मंगळवारीतील कांजीहाऊस चौकाजवळ राहत होता. रविवारी रात्री प्रकाश आणि त्याचा मित्र कैलास केशरवानी त्यांच्या मित्रासोबत जेवण करायला गुरुपाल हॉटेलमध्ये गेले. तेथे जेवण घेत असताना ते मोठमोठ्याने बोलत असल्यामुळे एका तरुणाने त्यांना हटकले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर प्रकाश आणि त्याचे मित्र हॉटेलबाहेर आले. तेथे रस्त्यावर आतमध्ये भांडण झालेल्या तरुणांचे साथीदार उभे होते. त्यांनी प्रकाश आणि त्याच्या मित्रांसोबत वाद घातला. ते मारहाण करू शकतात, ही भीती वाटल्याने घाबरलेला प्रकाश हा तिरपुडे कॉलेजजवळून पळू लागला. त्याचवेळी वेगात आलेल्या एका वाहनचालकाने त्याला जोरदार धडक मारली. गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला उपचारासाठी मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजेश जागोजी कोंदर्लीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.