गळफास लावून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:13+5:302021-04-06T04:08:13+5:30
रामटेक : अज्ञात कारणावरून गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली राेड पाॅवर हाऊस ...

गळफास लावून तरुणाची आत्महत्या
रामटेक : अज्ञात कारणावरून गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली राेड पाॅवर हाऊस परिसरात रविवारी (दि.४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
गणेश लच्छन मुरले (२०, रा. हेटीटाेक, ता. रामटेक) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत गणेश हा गुरुवारी (दि.१) सकाळी १० वाजताच्या सुमारास बकरीला चारा आणताे म्हणून घरून निघून गेला हाेता. दरम्यान, माहुली राेड पाॅवर हाऊसलगतच्या जंगलातील एका आंब्याच्या झाडाला नायलाॅन दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून ताे मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी लच्छन छत्रू मुरले (४२, रा. हेटीटाेक, ता. रामटेक) यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास नाईक पाेलीस उकेबाेंद्रे करीत आहेत.