तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST2021-07-17T04:08:45+5:302021-07-17T04:08:45+5:30
काटाेल : तरुणाने पाेल्ट्री फार्ममध्ये छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडी दिग्रस शिवारात ...

तरुणाची गळफास लावून आत्महत्या
काटाेल : तरुणाने पाेल्ट्री फार्ममध्ये छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडी दिग्रस शिवारात बुधवारी (दि. १४) घडली.
तुषार प्रकाश मालखेडे (२८, रा. फैलपुरा, काटाेल) असे मृताचे नाव आहे. तुषारची गाेंडी दिग्रस (ता. काटाेल) शिवारात शेती असून, शेतात पाेल्ट्री फार्म आहे. आपण पाेल्ट्री फार्मवर जात असल्याचे सांगून तुषार घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी परत न असल्याने धाकटा भाऊ गाैरव व वडील प्रकाश त्याला शाेधण्यासाठी पाेल्ट्री फार्मवर आले. तेव्हा त्यांना तुषार पाेल्ट्री फार्मच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने नायलाॅनच्या दाेरीने गळफास लावला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक गाैरव आगरकर करीत आहेत.