यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 21:51 IST2022-06-08T21:50:53+5:302022-06-08T21:51:19+5:30
Nagpur News यूपीएससीच्या परीक्षेत सलग तिसऱ्यांदा अपयश आल्याने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या
नागपूर : यूपीएससीच्या परीक्षेत सलग तिसऱ्यांदा अपयश आल्याने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ब्लेसन चाको (२८) असे त्याचे नाव आहे.
ब्लेसन याने आयुष्यात आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. पहिल्या दोन प्रयत्नांत त्याला यश लाभले नव्हते. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळेल, अशी त्याला आशा होती; परंतु निकाल लागल्यावर त्याचा अपेक्षाभंग झाला. रविवारी सायंकाळी वडील चर्चमध्ये गेले असताना त्याने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन संपविले.
माझे प्रयत्न अपुरे पडताहेत....
बी. टेक. केल्यावर मी प्रशासकीय अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले होते व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील सुरू होते. मात्र, माझे प्रयत्न अपुरे पडत आहेत. यामुळे मी नैराश्यात असून, जीवन संपवतो आहे, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.