Young man beaten up thinking theft in Nagpur | नागपुरात  चोर समजून तरुणाला मारहाण

नागपुरात  चोर समजून तरुणाला मारहाण

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : चोरटा समजून एका तरुणाला काही जणांनी बेदम मारहाण करून जखमी केले. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. सतेंद्र ऊर्फ छोटू पुरण यादव (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव असून तो महाकालीनगर पांडुरंग मंगल कार्यालयासमोर राहतो. गुरुवारी दुपारी त्याने त्याच्या आईला मारुती कंपनी चौकाजवळ सोडले आणि घराकडे परत निघाला. रस्त्यात त्याला फोन आला त्यामुळे तो नारी मेट्रो स्थानकाजवळ फोनवर बोलत उभा राहिला. मेट्रो स्टेशनवर काम करणारे काही जण त्याच्यावर धावून आले आणि त्यांनी सतेंद्रवर लोखंड चोरी करायला आला, असा संशय घेऊन त्याला आरोपी कुंदननानाजी रंगारकर याने पकडून ठेवले.तर इतरांनी लाकडी दांड्याने त्यास बेदम मारहाण केली. आजूबाजूच्या मंडळींनी धाव घेऊन सतेंद्रला आरोपींच्या तावडीतून सोडवले. सतेंद्रने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Young man beaten up thinking theft in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.