शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:11 IST

बुधवारी रात्री ९ च्या सुमारास पारडी परिसरात मनोज हरिभाऊ ठवकर नामक तरुणाची दुचाकी पीएसआय शिंदे यांना कट मारून पोलिसांच्या गस्ती वाहनावर धडकली.

नागपूर: मद्यपी तरुणाची दुचाकी वाहनावर धडकल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव मध्यरात्रीपर्यंत तणाव कायम होता. त्यामुळे शहरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पारडीच्या भवानी हॉस्पीटलमध्ये पोहोचले होते.बुधवारी रात्री ९ च्या सुमारास पारडी परिसरात मनोज हरिभाऊ ठवकर नामक तरुणाची दुचाकी पीएसआय शिंदे यांना कट मारून पोलिसांच्या गस्ती वाहनावर धडकली. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी ठवकरला बेदम मारहाण केली. आधीच मद्य प्राशन करून असलेल्या ठवकरची प्रकृती यामुळे अस्वस्थ झाली. तो निपचित पडल्याचे पाहुन पोलीस हादरले. त्यांनी त्याला श्री भवानी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ठवकरला मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त परिसरात कळताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि ठवकरचे नातेवाईक भवानी हॉस्पीटलमध्ये पोहोचले. पोलिसांच्या मारहाणीमुळे ठवकरचा मृत्यु झाल्याचा आरोप करुन त्यांनी तेथे घोषणाबाजी सुरु केली. जमाव हजाराच्या संख्येत होता. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. ही माहिती कळताच पोलीस दलातील बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉस्पीटलमध्ये पोहोचले. त्यांनी कसेबसे जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठवकरचा मृत्यु पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला त्यामुळे त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करून जमावाने पोलिसांच्या नावाने शिमगा केला. तणाव वाढलल्याने  अन्य पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस ताफा तसेच शिघ्र कृती दलाचे जवान हॉस्पीटलमध्ये बोलवून घेण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर