शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी युवा प्रबोधन

By admin | Updated: October 10, 2014 00:55 IST

लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा पवित्र आणि अमूल्य आहे, त्याचा आवर्जून वापर करा, असे आवाहन करीत गुरुवारी हजारो विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी रॅली काढली.

नागरिकांना आवाहन : विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीनागपूर : लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा पवित्र आणि अमूल्य आहे, त्याचा आवर्जून वापर करा, असे आवाहन करीत गुरुवारी हजारो विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी रॅली काढली. जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदार जागृती अभियानासाठी नियुक्त ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर व आंतरराष्ट्रीय बॅडमिन्टनपटू अरुंधती पाणतावने आणि स्वीप निरीक्षक विजय कुमार यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके, उपजिल्हाधिकारी जे.बी. संगीतराव, कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊ दायदार, महापालिकेचे उपायुक्त प्रमोद भुसारी, नायब तहसीलदार उज्वला तेलमासरे उपस्थित होत्या. लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य असून त्याचा त्यांनी आवर्जून वापर करावा आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे,असे आवाहन अरुंधती पाणतावने हिने केले.स्वत: मतदान करा आणि परिसरातील नागरिकांनाही सांगा तसेच युवकांनीही मतदान करून राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे स्वीप निरीक्षक विजय कुमार म्हणाले.रॅलीत २२ महाविद्यालयातील पाच हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. मतदानाचे महत्त्व सांगणारे फलक त्यांच्या हातात होते. वसंतराव नाईक समाज विज्ञान संस्थेपासून निघालेली रॅली व्हेरायटी चौक, महाराजबाग रोड, विद्यापीठ चौक, शासकीय मुद्रणालय या मार्गाने गेली. रिझर्व्ह बँक चौकात विसर्जित झाली.पर्यवेक्षकांची मतदारसंघांना भेट स्वीप निरीक्षक विजयकुमार यांनी नागपूर शहर तसेच ग्रामीण भागातील विविध भागांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला व त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. विजयकुमार यांनी पश्चिम, पूर्व, मध्य, उत्तर, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाला भेटी दिल्या. त्याच प्रमाणे हिंगणा मतदारसंघातील आडेगाव मतदान केंद्राला भेट दिली. बाजारगाव, कोंढाळी येथील मतदान केंद्राची पाहणी केली. सावनेर, कळमेश्वर तहसील कार्यालयात त्यांनी मतदार जागृती अभियानाचा आढावा घेतला. काटोल, नरखेड तालुक्यालाही त्यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)