नागपूरच्या रुबिना पटेल यांना यंदाचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:06 IST2017-12-21T22:05:45+5:302017-12-21T22:06:23+5:30

महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे (अमेरीका) दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाज कार्य पुरस्कार २०१७ ची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रबोधन या विभागात सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

This year's Maharashtra Foundation Award for Rubina Patel of Nagpur has been announced | नागपूरच्या रुबिना पटेल यांना यंदाचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर

नागपूरच्या रुबिना पटेल यांना यंदाचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर

आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे (अमेरीका) दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाज कार्य पुरस्कार २०१७ ची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रबोधन या विभागात सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुबिना पटेल या प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून आपल्या पायावर उभ्या झाल्या. पतीचे घर सोडून त्यांनी आईच्या मदतीने एमएसडब्ल्यू ही पदवी प्राप्त केली. मुस्लीम महिलांसाठी त्यांनी सातत्याने लढा देऊन रुबी सोशल वेलफेअर या सामाजिक संस्थेची उभारणी केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १२ वर्षांपासून विविध स्वरूपाचे रचनात्मक आणि संघर्षात्मक कार्य केले. त्यांनी मुस्लीम महिला, तरुणींना मुस्लीम पर्सनल लॉ, बालविवाह, पितृसत्ताक पद्धती, पडदाप्रथा, लैंगिकता, हिंसा या विषयांवर कार्यशाळांच्या माध्यमातून प्रबोधन केले. १३ जानेवारी २०१८ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी २ वाजता त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Web Title: This year's Maharashtra Foundation Award for Rubina Patel of Nagpur has been announced