शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा

By admin | Updated: June 27, 2014 00:37 IST

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमधून दबाव वाढल्याने अखेर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी पदाचा राजीनामा दिला.

विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा यवतमाळ : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमधून दबाव वाढल्याने अखेर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी पदाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर यापुढे मी किंवा माझा मुलगा विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणाही त्यांनी पत्रपरिषदेत केली. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे (यवतमाळ-वाशीम) आणि सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे (चंद्रपूर) यांचा पराभव झाला. निकालाच्या तब्बल महिनाभरानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली. त्यात कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. परंतु लोकसभेतील पराभवाला केवळ कार्यकर्तेच जबाबदार कसे, असा प्रश्न उपस्थित करीत कासावार यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. बुधवारी येथे काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी बैठक घेऊन पत्रपरिषदेत कासावारांच्या राजीनाम्याची मागणी केली. सगळीकडून दबाव वाढत असल्याचे पाहून अखेर वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपला राजीनामा सोनिया गांधींकडे पाठविल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. शिवाय मी किंवा माझा मुलगा या पुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही, परंतु पक्षाने कोणताही आदेश दिल्यास तो आपल्याला मान्य राहील, अशी भूमिका कासावारांनी जाहीर केली. आपल्या कार्यकाळात काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आली, पदाधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद होता, असा दावाही त्यांनी केला. पूर्वी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ विरोधकांकडे होते. परंतु यावेळी हिंगोलीची जागा काँग्रेसने पटकाविली. आपल्या कार्यकाळात काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा एक वरून चारपर्यंत वाढल्या. मी स्वत: पाच निवडणुका लढल्या, त्यातील चार जिंकल्या. ग्रामपंचायतपासून राजकारणाला सुरुवात केली. कुठेतरी थांबले पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात शिस्त नाही, नौटंकी करणारे कार्यकर्ते भरले आहेत. त्यांच्या बळावर विधानसभा निवडणूक जिंकणे शक्य नाही, म्हणूनच नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचेही कासावारांनी स्पष्ट केले. सोनिया गांधींनी नियुक्ती दिली म्हणूनच थेट त्यांच्याकडे राजीनामा पाठवत असल्याचे ते म्हणाले. आपल्या राजीनाम्याची मागणी बैठकीतही करता आली असती त्यासाठी पत्रपरिषद घेण्याची आणि पक्षांतर्गत विषय जाहीर करण्याची आवश्यकता नव्हती, असे कासावार म्हणाले. विशेष असे की राजीनाम्याचा निर्णय जाहीर करताना कासावार एकटेच पत्रपरिषदेला सामोरा गेले. (कार्यालय प्रतिनिधी)