यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक, शालार्थ आयडी प्रकरणातील मोठी कारवाई

By योगेश पांडे | Updated: December 23, 2025 21:01 IST2025-12-23T21:00:52+5:302025-12-23T21:01:47+5:30

Ravindra Katolkar Arrest News: ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत यवतमाळ येतील शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना अटक केली आहे. नागपुरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. त्यांना वर्धा येथून अटक करण्यात आली

Yavatmal Education Officer Ravindra Katolkar arrested, major action taken in Shalarth ID case | यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक, शालार्थ आयडी प्रकरणातील मोठी कारवाई

यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक, शालार्थ आयडी प्रकरणातील मोठी कारवाई

- योगेश पांडे 
नागपूर  -  ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत यवतमाळ येतील शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना अटक केली आहे. नागपुरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. त्यांना वर्धा येथून अटक करण्यात आली असून हे प्रकरण थंडबस्त्यात गेल्याची चर्चा करणाऱ्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणात यवतमाळचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांची सुरुवातीला चौकशीदेखील झाली होती व त्यांना अटकपूर्व जामीनदेखील मिळाला होता. काटोलकर हे अगोदर भंडारा येथे कार्यरत होते.

२४ डिसेंबर २०२१ ला ते नागपुरात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. २० मार्च २०२२ पर्यंत ते जिल्हा परिषदेत असताना त्यांना अनेक शिक्षण व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याची माहिती होती. परंतु वेतन संबंधात शाळेकडून आलेल्या प्रस्तावाची कुठलीही शहानिशा न करता त्यांचे थकीत वेतन देण्याची प्रक्रिया राबविली. त्यातून त्यांनी शासनाची १२ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. नागपुरातून त्यांची यवतमाळला बदली झाली. त्यांचे राहणे वर्धा येथे होते. मंगळवारी पोलिसांच्या पथकाने तेथून काटोलकरांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालायासमोर हजर करण्यात आले व २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या आता एकूण २७ इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक यांच्यासह सहायक शिक्षक, सहा लिपीक व कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे.

Web Title : यवतमाल के शिक्षा अधिकारी शालार्थ आईडी घोटाले में गिरफ्तार

Web Summary : यवतमाल के शिक्षा अधिकारी रवींद्र काटोलकर नागपुर में फर्जी शालार्थ आईडी बनाने के आरोप में गिरफ्तार। बिना सत्यापन वेतन स्वीकृत कर 12 करोड़ की धोखाधड़ी का आरोप। वर्धा से गिरफ्तारी, पुलिस हिरासत मंजूर। घोटाले में अब तक 27 गिरफ्तार।

Web Title : Yavatmal Education Officer Arrested in Shalarth ID Scam Case

Web Summary : Yavatmal Education Officer Ravindra Katolkar arrested for creating bogus Shalarth IDs while in Nagpur. Accused of 12 crore fraud by approving salaries without verification. Arrested from Wardha, police custody granted. Total 27 arrested in scam so far.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.