शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

नगरसेवकांना न भेटण्याची आयुक्तांची भूमिका चुकीची :  महापौर संदीप जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 9:14 PM

नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देनगरसेवक ६० हजार लोकांचे प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व आमची कार्यशैली वेगवेगळी आहे. पदाधिकारी आणि प्रशासन एका गाडीची चाके आहेत. नगरसेवक प्रभागातील ६० हजार लोकांचे प्रतिनिधी आहेत. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली.सभागृहाच्या माध्यमातून महापौर शहर विकासाचे व नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. त्याची अंमलबजावणी आयुक्त करतात. शहरातील नागरिकांच्या समस्या व तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी झोन स्तरावर जनता दरबार सुरू केले. परंतु काही प्रकरणे न्यायालयात तर काही नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहेत. अतिरिक्त बांधकामाच्या काही प्रकरणात कम्पाऊं डिंग शुल्कासाठी नगररचना विभागाकडे अर्ज केले आहेत. एकाच प्रकरणाच्या अनेक तक्रारी आहेत. आयुक्त सुद्धा जनता दरबाराच्या माध्यमातून लोक ांच्या समस्या सोडवित असतील तर आनंदच असल्याची प्रतिक्रीया संदीप जोशी यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.शहरातील अतिक्रमणाला आळा बसावा यासाठी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. यासमितीनी केलेल्या शिफारशीनुसार नवीन नियम तयार करण्यात आले आहे. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात आहे. यात दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आठवडी बाजाराला शिस्त लावली जाणार आहे. शहरातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी रस्त्यावरील व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्त कारवाई करीत आहेत. आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा फोन आला होता. मी महापालिका मुख्यालयात नव्हतो. ते सोमवारी भेटणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.महापौर जनता दरबारांना चांगला प्रतिसादझोन स्तरावर महापौर जनता दरबारांचे आयोजन केले जात आहे. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर आदी झोनमधील जनता दरबारला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आलेल्या नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका