जागतिक निद्रा दिन :पुरेशी झोप न झाल्यास लवकर येते म्हातारपण :सुशांत मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 08:25 PM2019-03-14T20:25:30+5:302019-03-14T20:26:48+5:30

पुरेशी झोप न झाल्यास म्हातारपण लवकर येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, म्हातारपणात दिसणारे आजारही लवकर येतात. विशेषत: मधुमेह, रक्तदाब हे आजार वयाच्या ४० किंवा ५० या वर्षात आढळून येतात. याला मानवी शरीरातील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘टेलोमर’ घटक कारणीभूत आहे. ज्यांची झोप चांगली होत नाही त्यांच्यामध्ये हा घटक कमी होत जातो. परिणामी, लवकर वृद्धत्व येते, अशी माहिती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रेस्पीरेटरी व स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.जागतिक निद्रा दिन हा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

World Sleep Day: Early onset if it does not get enough sleep: Sushant Meshram | जागतिक निद्रा दिन :पुरेशी झोप न झाल्यास लवकर येते म्हातारपण :सुशांत मेश्राम

जागतिक निद्रा दिन :पुरेशी झोप न झाल्यास लवकर येते म्हातारपण :सुशांत मेश्राम

Next
ठळक मुद्देरात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तन कॅन्सरचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुरेशी झोप न झाल्यास म्हातारपण लवकर येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, म्हातारपणात दिसणारे आजारही लवकर येतात. विशेषत: मधुमेह, रक्तदाब हे आजार वयाच्या ४० किंवा ५० या वर्षात आढळून येतात. याला मानवी शरीरातील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘टेलोमर’ घटक कारणीभूत आहे. ज्यांची झोप चांगली होत नाही त्यांच्यामध्ये हा घटक कमी होत जातो. परिणामी, लवकर वृद्धत्व येते, अशी माहिती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रेस्पीरेटरी व स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.जागतिक निद्रा दिन हा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुरेशी झोप व म्हातारपण यावर झालेल्या संशोधनाची अधिक माहिती देताना डॉ. मेश्राम म्हणाले, वटवाघुळाचे वजन काही ग्रॅममध्ये असते. परंतु हा पक्षी साधारण ४० वर्षे जगतो. यामागील कारणांचा शोध घेतला असता, वटवाघुळमधील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूला असलेला ‘टेलोमर’ हा घटक त्याच्या वाढत्या वयानुसार कमी होत नाही, उलट हा घटक कमी होऊ लागताच पुन्हा ‘रिजनरेट’ होतो. यामुळे वटवाघूळ त्याच्या वजनाच्या तुलनेत खूप जास्त वर्षे जगतो. याच्या उलट मानवी शरीरात आहे. वाढत्या वयामुळे ‘टेलोमर’ घटक कमी होतो. परंतु निद्रानाशाचा आजार असेल तर हा घटक लहान होण्याची गती वाढते. यामुळे चांगली झोप आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे.
कर्करोगाचा धोका १० टक्क्याने वाढतो
डॉ. मेश्राम म्हणाले, झोपेचे दोन टप्पे आहेत. एक ‘रेम स्लीप’ व दुसरी ‘नॉन रेम स्लीप’. पहिल्या टप्प्यात पापण्यांची फडफड, स्वप्नं पडणे आदी घडते. दुसऱ्या टप्प्यात पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात. याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना केली जाते. विशेषत: कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात. ही खूप महत्त्वाची व खरी झोप आहे. ही झोप न झाल्यास कर्करोग होण्याची शक्यता असते. रात्रपाळीत, उदा. ‘कॉल सेंटर’मध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण १० टक्क्याने वाढण्याचा धोका असतो.
अपुऱ्या झोपेमुळे वंध्यत्व
झोपेचे चार चक्र असतात. प्रत्येक चक्र सुमारे ९० मिनिटांची असतात. चौथ्या स्थितीमध्ये ज्याला साखरझोप संबोधतात, यात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. शरीराला लागणारे विविध ‘संप्रेरक’ (हार्मोन्स) तयार होतात. विशेषत: ‘प्रजनन हार्मोन्स’ही तयार होतात. मात्र झोपेच्या चक्रात वारंवार बदल झाल्यास या हार्माेन्स तयार होण्याची प्रक्रिया गडबडते. परिणामी, वंध्यत्वाचा धोका निर्माण होत असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले.
सकाळच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये निद्रानाश
दुपार पाळीच्या तुलनेत सकाळ पाळीतील विद्यार्थ्यांमध्ये निद्रानाशाचे प्रमाण वाढत असल्याचे एका पाहणीत आढळून आल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले. त्यांच्यानुसार, सकाळ पाळीची शाळा ही साधारण ७.३० ते ८.३० वाजताची असते. बहुसंख्य विद्यार्थी स्कूलबस, व्हॅनमधून शाळेत जात असल्याने त्यांना दोन तास आधी उठून तयारी करावी लागते. ५ ते १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांना १० तासांच्या झोपेची आवश्यकता असते. परंतु शाळेच्या वेळा पाळाव्या लागत असल्याने सहा ते सात तासांचीच झोप होते. निद्रानाशामुळे लहान मुलांमध्ये स्मृती कमी होणे (मेमरी लॉस) व वाढ खुंटणे आदी समस्या वाढतात.
चांगल्या झोपेसाठी हे करा

  • रोज ठरविलेली झोपण्याची व उठण्याची वेळ पाळा
  • दिवसा ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळू झोपू नका
  • झोपेच्या चार तास आधी धूम्रपान व मद्यपान करू नका
  • झोपेच्या सहा तास आधी चहा, कॉफी किंवा उत्तेजित करणारे पेय घेऊ नका
  • झोपण्याच्या चार तास आधी हलके जेवण घ्या
  • रोज व्यायाम करा, झोपण्याअगोदर व्यायम करू नका
  • झोपायचा बिछाना आरामदायक असावा
  • आवाज किंवा उजेडामुळे झोप भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी

 

 

Web Title: World Sleep Day: Early onset if it does not get enough sleep: Sushant Meshram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.