शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : नागपूरकरांनी अनुभवला कार्निव्हलचा झगमगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 8:35 PM

ऑरेंज मॉस्कॉटच्या गमतीजमती, लॉंग मॅन, मिरर मॅनच्या करामती, नेत्रदीपक फ्लोटचा कॉनव्हाय, डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या रशियन आणि युक्रेनच्या तरुणी, आफ्रिकन अ‍ॅक्रोबेटच्या चित्तथरारक कवायती, बटरफ्लाय गर्ल्सचा झगमगाट, मराठमोळ्या शिवसंस्कृती ढोलताशा पथकाचे व लेझीम पथकाचे दणकेबाज सादरीकरण, असा देशी आणि विदेशी संस्कृतीचा सुरेख संगम नागपूरकरांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या कार्निव्हल परेडमध्ये अनुभवला. उपराजधानीत सलग दुसऱ्या वर्षी कार्निव्हल परेडचे आयोजन झाले. रविवार सुटीचा दिवस असल्याने नागपूरकरांची सायंकाळ खऱ्या अर्थाने रंजक ठरली.

ठळक मुद्देरस्त्याच्या दुतर्फा उत्स्फूर्त प्रतिसाद : विदेशी तरुणी व आफ्रिकन अ‍ॅक्रोबेट, नयनरम्य फ्लोट ठरले आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑरेंज मॉस्कॉटच्या गमतीजमती, लॉंग मॅन, मिरर मॅनच्या करामती, नेत्रदीपक फ्लोटचा कॉनव्हाय, डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या रशियन आणि युक्रेनच्या तरुणी, आफ्रिकन अ‍ॅक्रोबेटच्या चित्तथरारक कवायती, बटरफ्लाय गर्ल्सचा झगमगाट, मराठमोळ्या शिवसंस्कृती ढोलताशा पथकाचे व लेझीम पथकाचे दणकेबाज सादरीकरण, असा देशी आणि विदेशी संस्कृतीचा सुरेख संगम नागपूरकरांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या कार्निव्हल परेडमध्ये अनुभवला. उपराजधानीत सलग दुसऱ्या वर्षी कार्निव्हल परेडचे आयोजन झाले. रविवार सुटीचा दिवस असल्याने नागपूरकरांची सायंकाळ खऱ्या अर्थाने रंजक ठरली.विजय दर्डांनी केले अवलोकनलक्ष्मीनगर आठ रस्ता चौकातून निघालेल्या कार्निव्हल परेडची नागपूरकर अनुभूती घेत असतानाच लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनीही हॉटेल अशोकाच्या समोरून कार्निव्हल परेडचा आनंद लुटला. फ्लोटचा काफिला, कलावंतांचे सादरीकरण आणि नागपूरकरांचा कार्निव्हलला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.अशी होती कार्निव्हल परेडआठ रस्ता चौकातून सायंकाळी ५ वाजता शंखनाद होताच कार्निव्हल परेडला सुरुवात झाली. परेडच्या सुरुवातीलाच ऑरेंज मॉस्कोट, बायकर्सचा समूह, लाँग मॅन आणि मिरर मॅन, आफ्रिकन अ‍ॅक्रोबेट, बटरफ्लाय गर्ल, कार्निव्हल परेडचे संचलन करणारे शिवसंस्कृती ढोलताशा पथक, या पथकाच्या मागे मेजर हेमंत जकाते शाळेचे लेझिम पथक, स्केटिंग करणारी मुले, त्यापाठोपाठ नेत्रदीपक फ्लोटस् (चित्ररथ) यात प्लास्टो कंपनीचा फ्लोट, व्हीक्को कंपनीचा फ्लोट, ओसीडब्ल्यू, रोकडे ज्वेलर्स, हल्दीराम, मेट्रो व अन्य दोन आाकर्षक फ्लोट यात समाविष्ट होते.नागपूरकरांनी लुटला आनंदअनेकानी गोव्यात अथवा विदेशात कार्निव्हल अनुभवला असेल. पण नागपूरकर गेल्या दोन वर्षांपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त काढण्यात येणाऱ्या कार्निव्हलचा आनंद लुटत आहे. लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौकदरम्यान नागपूरकरांची उत्सुकता, उत्साह दिसून आला. मार्गात रस्त्याच्या दुतर्फा नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्निव्हलची दृश्ये अनेकांनी कॅमेराबद्ध केली. आकर्षक चित्ररथांसोबत अनेकांनी सेल्फी काढून घेतल्या. विदेशी नृत्यावर रशियन तरुणीच नव्हे तर नागपूरकर रसिकांनीही ठेका धरला होता. ज्येष्ठ नागरिकांनी तर गॅलरीतूनच हा सर्व जल्लोष अनुभवला.शिवसंस्कृतीचा दणदणाट, लेझीमचा छणछणाटकार्निव्हल परेडचा दणदणाट संपूर्ण परिसरात गरजला तो शिवसंस्कृती ढोलताशा पथकामुळे. पथकात ५० ते ६० युवक-युवतींनी आपल्या शिस्तबद्ध वादनाने संपूर्ण कार्निव्हलचा मार्ग दणाणून सोडला. त्याचबरोबर मेजर हेमंत जकाते शाळेच्या ३५ विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून लेझीमच्या छणछणाटाने कार्निव्हल परेडमध्ये रंगत आणली.

विदेशी बालांचा देशी ठुमका...

कार्निव्हलचे खरे आकर्षण ठरले ते रशियन अन् युक्रेनच्या तरुणी. पांढऱ्याशुभ्र पोशाखात विदेशी वाद्य वाजवित कार्निव्हल परेडमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. दुसरीकडे युक्रेनच्या तरुणींनी देशी संगीतावर फेर धरून जोरदार ठुमका लावला. अख्ख्या कार्निव्हल परेडमध्ये नागपूरकरांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्यांनीही हात उंचावत नागपूरकरांच्या उत्साहात भर घातली.

क्षणचित्रे...

  • अझका बनच्या गेमिंग झोनच्या फ्लोटवर एडीए ग्रुपचे दमदार सादरीकरण, रशियन आर्टिस्ट इस्मीचा पारंपारिक पोशाखात फ्री स्टाईल डान्स
  • ओसीडब्ल्युने दिला आकर्षक फ्लोटच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश
  • व्हिको आयुर्वेदच्या फ्लोटने केली आयुर्वेदाबाबत जनजागृती
  • मेट्रोच्या फ्लोटने वेधले नागपूरकरांचे लक्ष
  • हल्दिरामच्या फ्लोटची आकर्षक सजावट, संत्र्याच्या पदार्थांचे प्रदर्शन
  • आफ्रिकन अ‍ॅक्राबेट्सच्या चित्तथरारक कवायती
  • स्केटिंगवर लहान मुलांची स्टंटबाजी
  • भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फ्लोटचा सहभाग
  • मिरर मॅन अन् लाँग मॅनच्या गमतीदार करामती
  • ऑरेंज मॉस्कोटशी हस्तांदोलन करण्यासाठी चिमुकल्यांची चढाओढ
  • बटर फ्लाय गर्ल्सनी उधळल्या रंगीबेरंगी छटा
  • फुग्यांची आकर्षक सजावट अन् नेत्रदीपक रोशनाई
  • नागपूरकर कलावंतांकडून संगीताची मेजवानी
  • प्लॅस्टोने वाटले छोट्या टाकीचे वाण
  • रस्त्याच्या दुतर्फा अन् गॅलरीत झाली गर्दी
  • तरुणाईने सेल्फी घेत लुटला कार्निव्हलचा आनंद
टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर