शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

जागतिक बौद्धिक संपदा दिन; स्वत:च्या बौद्धिक संपदेचे करा पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 11:03 IST

आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभारतीय संशोधनात पुढे पण पेटंट करण्यात मागे पेपर प्रसिद्ध करून नुकसान करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय विद्यार्थी, संशोधक हे संशोधनात पुढे आहेत. त्यांचे संशोधन जगाच्या संशोधनापेक्षा वेगळे व बहुउपयोगी आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत ते आपल्या संशोधनाचे पेटेंट मिळवित नाही. गेल्यावेळी चीनसारख्या देशाने त्यांच्या संशोधनांचे पेटेंट घेण्यासाठी तब्बल ११ लाख फाईलिंग केले. तर भारतातून येणाऱ्या अर्जांची संख्या फक्त ४७ हजार होती. विशेष म्हणजे या ४७ हजारांमध्येही विदेशातील अर्ज करणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांवर होती.आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.राजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स (आरजीआयजीआर) ही केंद्र सरकारची संस्था बौद्धिक संपदेचे पेटेंट करण्यासाठी जगजागृतीचे काम करीत आहे. भारतात अनेक लोक संशोधन करतात. संशोधन झाले की एखाद्या राष्ट्रीय परिषदेत त्याचा पेपर प्रसिद्ध करून मोकळे होतात. असे केल्याने त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांचा कुठलाही हक्क शिल्लक राहत नाही. ती माहिती जगासाठी मोकळी झालेली असते. एकदा माहिती प्रसिद्ध झाली की नंतर तिचे पेटेंट मिळविता येत नाही. त्यामुळे संशोधकांनी आपल्या संशोधनाचे आधी पेटेंट मिळवून आपली बौद्धिक संपदा कशी सुरक्षित करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.१९८० मध्ये नागपुरात फक्त पेटेंट इन्फरमेशन सेंटर होते. मात्र, आता या केंद्रातर्फे प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जात आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने, संशोधकाने एखादे संशोधन केले तर त्या संशोधनाचे पेटेंट त्याने कसे मिळवावे, याची माहिती देण्यासाठी संस्थोतर्फे शिबिर आयोजित केले जातात. प्रशिक्षण घेतले जाते.गेल्या वर्षभरात संस्थेने अशा ९४ कार्यशाळा घेतल्या आहेत असून चार हजारावर लोकांना प्रशिक्षणही दिले आहे. यातून जागृती निर्माण होऊन आता पेटेंटसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. देशात आजवर दोन लाखावर लोकांनी पेटेंट घेतले आहे. येत्या काळात या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

असे मिळवा पेटंटआपण एखादे संशोधन केले की त्याची नोंदणी ipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन करता येते. वेबसाईटवर फॉर्म नंबर १,२ व ३ मध्ये आपल्या संशोधनाची संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो. त्यानंतर तुम्ही सादर केलेल्या माहितीचे परीक्षण करण्याची प्रकिया सुरू होते. संस्थेचे परीक्षक त्याचे आॅनलाईन परीक्षण करतात. त्यात काही त्रुटी असतील, अडचणी असतील तर आपल्याला आॅनलाईन कळविले जाते. त्रुटी पूर्ण करण्याची संधी दिली जाते. ही सर्व प्रक्रिया तीन ते चार वर्षे चालते. यासाठी फक्त ५,६०० रुपये शुल्क आकारले जाते. एखाद्याला ही प्रकिया कमी वेळात करायची असेल तर त्यासाठी मात्र विशेष शुल्क भरावे लागते.

विदर्भाने घ्यावा पुढाकारराजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स या संस्थेद्वारे इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील अनेक तरुण येथे येऊन प्रशिक्षण घेऊन जातात. परंतु, संस्थेकडे विदर्भ व नागपुरातून येणारा तरुण वर्ग तुलनेने फारच कमी आहे. विदभार्तून दरवर्षी पेटंट नोंदणीसाठी फक्त एक हजार अर्ज प्राप्त होतात. ही संख्या वाढण्याची गरज आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक