शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक ब्रेन ट्यमूर दिन; पुरुषांपेक्षा महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 07:00 IST

Nagpur News प्राथमिक ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते. महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्दे१०० पेक्षा जास्त वेगवेगळे प्रकार७१ टक्के ट्यूमर सौम्य

नागपूर : मेंदू आपल्या अनेक महत्त्वाच्या शरीराच्या कार्यांवर नियंत्रण ठेवतो. परंतु ट्यूमरमुळे त्यात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे लक्षणे दिसताच उपचार आवश्यक आहे. प्राथमिक ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते. महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे.

८ जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिन म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर न्युरोसर्जन डॉ. पलक जयस्वाल यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण महिलांमध्ये ५८ टक्के तर पुरुषांमध्ये ४२ टक्के आहे. मेंदूत ट्यूमरचे निदान होणे घातक ठरू शकते आणि रुग्णाचे आयुष्य बदलू शकते.

-ब्रेन ट्यूमर समजून घ्या

डॉ. जयस्वाल म्हणाले, ट्यूमर म्हणजे, मेंदूच्या ऊतींमधील असामान्य पेशींची वाढ. यामुळे दृष्टी, बोलणे, हालचाल, विचार व भावना यात अडथळे येऊ शकतात.

:: ब्रेन ट्यूमरबद्दल वास्तव

- ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात होऊ शकतो.

-ट्यूमरच्या सर्व प्रकरणांपैकी सुमारे ४ टक्के प्रकरणे ० ते १४ वयोगटातील मुलांमध्ये आढळतात.

- सर्व ब्रेन ट्यूमरपैकी सुमारे ७१ टक्के ट्यूमर सौम्य असतात.

- ब्रेन ट्यूमर रुग्णांसाठी सरासरी जगण्याचा दर ७५.७ टक्के असतो.

- प्राथमिक ब्रेन ट्यूमरचे १०० पेक्षा जास्त वेगळे प्रकार आहेत.

:: ब्रेन ट्यूमरचे प्रकार

- सौम्य ट्यूमर - ज्यामध्ये आक्रमक कर्करोगाच्या पेशी नसतात आणि बहुतेक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर परत वाढत नाहीत.

- घातक ट्यूमर- कर्करोगाच्या पेशी असतात ज्या जवळच्या ऊतींमध्ये पसरतात आणि उपचारानंतर पुन्हा वाढू शकतात.

- प्राथमिक ट्यूमर -मेंदूच्या पेशींमध्ये गाठ होण्यास सुरुवात होते. हे मेंदूच्या किंवा मणक्याच्या इतर भागांमध्ये पसरू शकते.

- मेटास्टॅटिक किंवा दुय्यम ट्यूमर- हा घातक असतो. शरीराच्या दुसऱ्या भागातून आलेल्या कर्करोगाच्या पेशींपासून वाढतो.

::लक्षणे

ब्रेन ट्यूमरची लक्षणे त्याचे स्थान, आकार, वाढीचा दर व अवस्था यावर अवलंबून असतात.

- डोकेदुखी

- चालणे, बोलणे किंवा विचार करणे कठीण होणे

-अशक्तपणा

- चक्कर येणे

- असामान्य हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे

- दृष्टी समस्या निर्माण होणे

- उलट्या होणे

::ब्रेन ट्यूमरवर उपचार

- शस्त्रक्रिया- ट्यूमर शस्त्रक्रियेने काढला जातो.

- रेडिएशन थेरपी- रेडिएशनचा उच्च डोस कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यासाठी वापरला जातो.

- केमोथेरपी- कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी शक्तिशाली रसायने वापरतात.

- लक्ष्यित थेरपी

- ट्यूमर विरोधी औषधे

टॅग्स :Healthआरोग्य