वनदेवीनगरात लाकडाचे टाल आगीत खाक
By मंगेश व्यवहारे | Updated: June 7, 2024 15:54 IST2024-06-07T15:53:50+5:302024-06-07T15:54:24+5:30
Nagpur : आगीत १० हजार रुपयांचे नुकसानीचा अंदाज

Fire in Vandevinagar
नागपूर : वनदेवी नगर येथील लाकडाच्या टालला ५.५० वाजताच्या सुमारास आग लागल्याचा अग्निशमन विभागाला आला. मोठ्या स्वरुपाची आग असल्याने सुगतनगर अग्निशमन केंद्रातून दोन वाहने घटनास्थळाकडे पाठविण्यात आली. पथकाच्या जवानांनी तत्काळ कार्यवाही सुरू केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत प्लायवूड मटेरियल, संगणक आदी जळून खाक झाल्याने ५ लाख रुपयांचे अंदाजे नुकसान नोंदविण्यात आले आहे. आगीचे कारण अज्ञात आहे.
श्रद्धा फरसानच्या गोदामाला आग
रामकुलर चौकातील श्रद्धा फरसानच्या गोदामात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच न्यू कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातून गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली. अग्निशमनच्या पथकाने आग विझवून केलेल्या पंचनाम्यानुसार आग लागल्याचे कारण अज्ञात असून, १० हजार रुपयांचे नुकसानीचा अंदाज वर्तविला आहे.