अजब प्रकार : हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 20:37 IST2018-11-10T20:32:40+5:302018-11-10T20:37:14+5:30
दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

अजब प्रकार : हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
१ जुलै २०१८ रोजी बसपा प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे हे आपल्या पक्षाच्या एमएच ४९/एएस ७७७७ क्रमांकाच्या इनोव्हा कारने जात असताना अग्रसेन चौक येथे सीसीटीव्हीने घेतलेल्या फोटोनुसार हेल्मेट घातलेले नाही, अशा प्रकारची नोटीस त्यांना वाहतूक विभागाने पाठवली आहे. कार चालविताना सीटबेल्ट लावणे अनिवार्य असल्याने त्यांनी व
बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे सध्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते नागपुरात आल्यानंतर त्यांना ही अफलातून नोटीस मिळाली.
पोलिसांनी ही नोटीस मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी व पैशाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अश्या प्रकारची घोडचूक यानंतर होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी बसपा प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांनी केली आहे.