शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

देशाच्या विकासात महिलांचे आरोग्य महत्त्वाचे : अमृता फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 23:28 IST

संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. अनेक महिला घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक महिला कर्करोगाच्या अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये उपचारासाठी येतात. वेळेपूर्वीच कर्करोग निदान झाल्यास रुग्णासोबतच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने हाती घेतलेली ‘आयुष्यमती’ योजना ही प्रभावी ठरेल, असे मत अमृता फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या ‘आयुष्यमती’ योजनेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. अनेक महिला घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक महिला कर्करोगाच्या अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये उपचारासाठी येतात. वेळेपूर्वीच कर्करोग निदान झाल्यास रुग्णासोबतच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने हाती घेतलेली ‘आयुष्यमती’ योजना ही प्रभावी ठरेल, असे मत अमृता फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्यावतीने आऊटर हिंगणा रिंगरोड, जामठा येथील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने ‘आयुष्यमती’ योजना व वेब पोर्टलचे लोकार्पण झाले. याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या संचालक, मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता यांच्यासह नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, संयुक्त संचालक (प्रशासन) अनिल शर्मा उपस्थित होते.फडणवीस म्हणाल्या, कर्करोगाला हरवायचे असेल तर एकत्रित लढ्याची गरज आहे. या रोगाविषयी आपण संवाद साधणे सुरू केल्यास याचा नक्कीच फायदा होईल. सोबतच कर्करोगाविषयी गैरसमजही दूर होतील. कर्करोगाच्या लक्षणांची, त्याच्या आजराची माहिती केवळ शहरातच नव्हे तर गाव-खेड्यांमध्येही पोहचविल्या जात आहे. यासाठी शासन मदत करीत आहेच. ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची ‘आयुष्यमती’ योजनाही यात भरीव मदत करणारी ठरणार आहे. प्रास्ताविक डा. मेधा दीक्षित यांनी केले. संचालन शब्बीर भारमल यांनी तर जोगळेकर यांनी मानले.डॉ. दत्ता म्हणाल्या, अद्यावत तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे कर्करोग जीवघेणा आजार राहिलेला नाही. तरीही पहिल्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान होऊन उपचार झाल्यास त्याची गंभिरता टाळणे आवश्यक आहे. सोबतच कर्करोगाविषयी गैरसमजही दूर करणे गरजेचे आहे. महिलांना आजाराच्या लक्षणांची माहिती नसल्याने व आजार होऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विशेषत: कॅन्सरमध्ये त्या ‘अ‍ॅडव्हान्स’ स्टेजला येतात. परिणामी, पुरुषांच्या तुलनेत कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण महिलांंमध्ये जास्त आहे. यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.२०५० पर्यंत देश ‘कॅन्सर कॅपिटल’ होण्याची भीतीडॉ. पाठक म्हणाले, वाढते वय, अनुवांशिकता, पर्यावरण व अयोग्य जीवनशैली यामुळे कॅन्सर वाढत आहे. याशिवाय, कॅन्सरविषयी अज्ञान, जागृतीचा अभाव, सामाजिक व आर्थिक परिस्थिती, भीती, प्रकृतीकडे दुर्लक्ष यामुळे कॅन्सरच्या वेळीच निदानाकडे दुर्लक्ष होत आहे. असेच राहिल्यास २०५० पर्यंत देश ‘कॅन्सर कॅपिटल’ होण्याची भीती आहे. यामुळे कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान होणे व उपचार घेणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी स्तन, गर्भाशय, अंडाशय कर्करोगाची माहिती, लक्षणे व उपचाराची माहिती दिली.‘आयुष्यमती’ योजनेतून दर शनिवारी नि:शुल्क तपासणीकर्करोगावर यशस्वी उपचारासाठी त्याचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने ‘आयुष्यमती’ योजना हाती घेतली आहे. यात या इन्स्टिट्यूटमध्ये दर शनिवारी ४० वर्षांवरील महिलांची मेमोग्राफी, सोनोग्राफी, पॅप्समिअर व गरजेनुसार इतरही तपासण्या नि:शुल्क केल्या जातील. दर आठवड्याला २५ महिलांची तर वर्षाला १५०० महिलांच्या तपासणीचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे, या योजनेतून महिलांच्या आरोग्याचा पाठपुरावाही केला जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांच्या कर्करोगाची माहिती सामाजिक संस्था व इतरही संघटनांच्या मदतीने घराघरात पोहचविचा आमाचा प्रयत्न आहे, असे शैलेश जोगळेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसcancerकर्करोग