शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

कन्हान : जागतिक महिला दिनानिमित्त कन्हान पाेलीस ठाण्याच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष करुणा आष्टनकर, सहायक पाेलीस ...

कन्हान : जागतिक महिला दिनानिमित्त कन्हान पाेलीस ठाण्याच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष करुणा आष्टनकर, सहायक पाेलीस निरीक्षक नंदा पाटील यांची उपस्थिती हाेती. प्रारंभी क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पाेलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी व संजय सत्येकार यांच्या हस्ते महिला पाेलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नितू तिवारी, जोशीला उके, ममता दास, शुभांगी घाेगले, इंद्रा कुर्मी, वैशाली बेलनकर, वैशाली थोरात, कुंदा माेटघरे, माया तितरमारे, उषा पोटभरे, प्रियंका सलामे, स्मिता पाटील, मंगला पिल्ले, लीना हरोडे, लता लुंढुरे, मनिषा चिखले आदींची उपस्थिती हाेती.

....

पंचायत समिती सावनेर

सावनेर : महिला दिनाचे औचित्य साधून सावनेर पंचायत समिती येथे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पराते, पं. स. सदस्य गाेविंदा ठाकरे व सहायक खंडविकास अधिकारी दीपक गरुड यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना गाैरवान्वित करण्यात आले.

...

ग्रामपंचायत माेहदी (दळवी)

नरखेड : जागतिक महिला दिनानिमित्त नरखेड तालुक्यातील माेहदी (दळवी) ग्रामपंचायत येथे विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी पं.स. उपसभापती वैभव दळवी, नरखेड पाेलीस स्टेशनच्या एकदिवसीय ठाणेदार मनिषा सावरकर, पाेलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे, उपसरपंच वसंता दुधकवळे तसेच महिला पाेलीस कर्मचारी रजनी टेकाडे, दीपिका लटपटे, उज्ज्वला साठोणे, रंजना लक्षपकात, उज्ज्वला वैद्य, हेमलता मजातपुरे, लक्ष्मी उके, ज्योती काळबांडे, संगीत अंतुरकर तसेच ग्रा.पं. सदस्य, पाेलीस पाटील व गावातील महिलांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमात मनिषा सावरकर यांनी महिला दिनाचे महत्त्व व महिलांचे अधिकार यावर मार्गदर्शन केले. गावात घराेघरी भेटी देऊन महिलांच्या समस्या व अडचणींवर चर्चा करण्यात आली.

....

पंचायत समिती नरखेड

नरखेड : स्थानिक पंचायत समिती येथे महिला दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सभापती नीलिमा सतीश रेवतकर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपसभापती वैभव दळवी, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, विस्तार अधिकारी रामदास गुंजरकर, कृषी अधिकारी जितेंद्र तोडासे, सागर गतपणे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सभापती नीलिमा रेवतकर यांनी माैलिक विचार मांडले. कार्यक्रमाला उपस्थित महिला सरपंच, उपसरपंच, बचत गटाच्या सदस्य व इतर महिलांना लाेकमत कालदर्शिका भेट देण्यात आली.

....

ग्रामपंचायत इसापूर

पिपळा (डाकबंगला) : परिसरातील इसापूर ग्रामपंचायत येथे महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच मालती खोकले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका उषा ठाकरे, कल्पना मेश्राम, ग्रामसेवक दिलीप हेडाऊ, आशिष गोडबोले, आशा सेविका इंगुळकर, निंदेकर उपस्थित होते.

...

न. प. माध्यमिक विद्यालय कळमेश्वर

कळमेश्वर : नगर परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पाैर्णिमा मेश्राम हाेत्या. त्यांनी स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे, तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. तिने काेणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी सराेज वाणी, उपमुख्याध्यापक दादाराव जांभुळकर, प्रतिछाया गाेखे, रंजना लांजेवार यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मातांना सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन गाैरविण्यात आले. संचालन सेवकराम नेरकर यांनी केले तर आभार नीलेश बावनथडे यांनी मानले.