शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

Women's Day 2019; टीचर ते डीसीपी; श्वेता खेडकरांचा यशस्वी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 10:15 IST

सरळ साधी शिक्षिका म्हणून विद्यार्थी- शिक्षकांमध्ये ओळखल्या जाणारी श्वेता खेडकर चक्क पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू होते.

ठळक मुद्देधाडसी अन् कर्तृत्ववान अधिकारी

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मार्च २०११ मध्ये नागपुरात मोनिका किरणापुरे हत्याकांडाने खळबळ उडवली होती. लाख प्रयत्न करूनही आरोपी हाती लागत नव्हते. या प्रकरणाचा तपास राज्य पोलीस दलाच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. त्यावेळी अमरावतीच्या एसीपी म्हणून कार्यरत असलेल्या श्वेता खेडकर नागपुरात आल्या. जेथे मोनिका राहत होती, त्या वसतिगृहात श्वेता विद्यार्थिनी म्हणून मुक्कामी थांबल्या अन् अवघ्या पाच दिवसात त्यांनी या तपासाचा धागा पकडला. या धाग्यामुळेच मारेकऱ्यांच्या हातात पोलिसांना बेड्या ठोकता आल्या.अमरावती जिल्ह्यातील खेड(ता. चांदूर बाजार)मधील श्वेता सदाशिव खेडकर ही युवती राज्यशास्त्र, समाजशास्त्रात एम.ए. करते. २० व्या वर्षीच (१९९८) शिक्षिका म्हणून चिखलदरा तालुक्यातील मोथा या खेडेगावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होते.खोडकर विद्यार्थ्यांना वळणावर आणणे जास्त कठीण नाही. नियोजनपूर्वक प्रयत्न केले तर त्यांना लवकर वळणावर आणता येते. मात्र समाजाला अस्वस्थ करू पाहणाऱ्या समाजकंटकांना वळणावर नव्हे वठणीवर आणणे फार कठीण असते. कारण विद्यार्थी खोडकर असला तरी तो सामाजिक संस्कारात, कौटुंबिक धाकात असतो. गुन्हेगाराचे संस्काराशी देणे-घेणे नसते अन् त्याला कुणाचा धाकही वाटत नाही, म्हणून तो समाजाला आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांच्या वाटेला कुणी जात नाही अन् त्यांना समजाविण्याचे आव्हान स्वीकारण्याच्याही कुणी भानगडीत पडत नाही. शाळेत शिकविताना ही बाब ध्यानात आल्यानंतर एक सरळ साधी शिक्षिका गुन्हेगारांना धडा शिकविण्याचा मनोमन विडा उचलते. कुणाच्या ते ध्यानीमनीही नसते. त्यानंतर कोणतीही अकादमी नव्हे अन् कुणाचेही मार्गदर्शन न घेता छोट्याशा खेड्यातून रोज शाळेत शिकवायला जाताना कधी काळी-पिवळीतून तर कधी एसटीतून अप-डाऊन करताना समाजकंटकांना धडा शिकविण्याचा अभ्यास सुरू राहतो. परिणामी, सरळ साधी शिक्षिका म्हणून विद्यार्थी- शिक्षकांमध्ये ओळखल्या जाणारी श्वेता खेडकर चक्क पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू होते.भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून २००७ ला पहिली नियुक्ती मिळाली असताना, देश-विदेशात खळबळ उडवून देणारे खैरलांजी प्रकरण घडते. या प्रकरणाची हाताळणी अन् प्राथमिक तपास अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसतो. चोहोबाजूने प्रचंड दडपण मात्र या तपासात महत्त्वाची भूमिका वठवून श्वेता खेडकर यांनी स्वत:ला अभ्यासू पोलीस अधिकारी म्हणून प्रूव्ह केलेले असते.शिक्षक-शिक्षिका बोलघेवड्या असतात, असे म्हणतात. क्लास घेताना अंगवळणी पडल्याप्रमाणे ही मंडळी कुठेही अघळपघळ बोलताना दिसतात. मात्र, श्वेता खेडकर अत्यंत शांत, संयमी आणि कमीतकमी बोलणाऱ्या आहेत.शहर पोलीस दलात कार्यरत डीसीपी श्वेता खेडकर म्हणजे एक हसतमुख, शांत अन् सुस्वभावी व्यक्तिमत्त्व. लॉटरी लागली, एटीएम कार्ड ब्लॉक झाले, असे सांगून देशभरातील लाखो लोकांना फसविणारी सायबर टोळी त्यांनी थेट झारखंडमध्ये जाऊन पकडली. कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे करणारे नागपुरातील ठगबाज, नोकरीच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांच्या नागपूर, चंद्रपूर, दिल्लीतील बोगस कॉल सेंटरवर त्यांनी छापे मारले. भंडाऱ्यातील खैरलांजी प्रकरणाचा तपास, बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्याकांड, अमरावतीतील टोळीयुद्ध, जातीय दंगल अशी पोलीस दलास जेरीस आणणाऱ्या अनेक प्रकरणात त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्याकडे बघितल्यास, त्यांना पहिल्यांदा भेटल्यास ही महिला अधिकारी एवढी धाडसी आणि कर्तृत्ववान आहे, हे लक्षातच येत नाही. पोलीस सेवेत त्यांना मिळालेली पदके आणि सन्मान त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देऊन जाते.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन