शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

२४ मे रोजी ‘महिला आयोग’ आपल्या दारी

By admin | Updated: May 22, 2016 02:49 IST

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने २४ मे रोजी नागपूर येथे विभागीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने २४ मे रोजी नागपूर येथे विभागीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. रविभवन, शासकीय विश्राम गृह, सिव्हील लाईन, नागपूर येथे जनसुनावणी होईल. महिला आयोगातर्फे २३ मे रोजी महापालिकेच्या तेजसिंहराव भोसले सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये महिलांविषयक कायदे, जेंडर सेन्सेटीव्हिटी आणि ग्रुप डिस्कशन अशी सत्रे होणार आहे.यात मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील मान्यवर तज्ञ येणार आहे. या विषयाच्या संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.सुनावणीदरम्यान, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मिडीएटर म्हणून काम करणारे विविध सरकारी, खासगी संस्थातील व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत समुपदेशक तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस तक्रार निवारण समितीच्या सदस्या यांच्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीस नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांच्या महिलांनी येऊन आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)