पाकिस्तानात गेलेल्या महिलेची आज होणार नागपुरात चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:24 IST2025-05-29T12:22:57+5:302025-05-29T12:24:04+5:30
Nagpur : पाकिस्तान भेटीचे कारण शोधणार

Woman who went to Pakistan to be questioned in Nagpur today
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारगिलमधील हुंदरमन गावाजवळ नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणारी सुनीता गटलेवार हिची गुरुवारी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूर पोलिसांचे पथक तिला नागपुरात घेऊन आले. मात्र, तिच्या मुलाची अद्याप कस्टडी न मिळाल्याने कुटुंबीयांना त्याचा ताबा मिळण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाकिस्तानातील एका धर्मगुरूला भेटण्यासाठी नागपुरातील ४३ वर्षीय महिला सुनीता ही कारगिलमधील नियंत्रण रेषा ओलांडून गेल्यामुळे खळबळ उडाली होती. पाकिस्तानी रेंजर्सने तिला पकडले व त्यानंतर तिला बीएसएफच्या हवाली केले. मागील काही काळापासून ती पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत चॅटिंग करत होती. ४ मे रोजी ती घरातून बेपत्ता झाली. तिची कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरू होती. मुलगा कारगिल सीमेवरील हुंदरमन या गावात असल्याची माहिती तेथील पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविली. सुनीताचा मुलगा सध्या कारगिल बॉर्डर येथे चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या कस्टडीत आहे. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथे त्यांनी तिची चौकशीदेखील केली. कपिलनगर पोलिस ठाण्यातील एक अधिकारी, दोन महिला कर्मचारी व आणखी एक कर्मचारी असे पथक अमृतसरला गेले होते. त्यांनी तिला ताब्यात घेतले व पथक नागपूरकडे निघाले. तिची गुरुवारी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अमृतसर पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवला आहे. तिचा कायमचा पत्ता नागपूरमध्ये असल्याने नागपूरमधील कपिलनगर पोलिस ठाण्यात तो हस्तांतरित केला जाईल. सुनीता परतली असली तरी तिचा १२ वर्षाचा बालमुलगाण सभिजूनही कारगिलमधील बालकल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) ताब्यात आहे. पोलिस या प्रकरणावर सक्रियपणे समन्वय साधत आहेत आणि तो पुढील काही दिवसांत परत येण्याची अपेक्षा आहे.