सामूहिक बलात्कार करून फोडले महिलेचे डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:16 IST2018-08-16T05:15:46+5:302018-08-16T05:16:15+5:30
चार नराधमांनी वेकोलितील एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात घडली.

सामूहिक बलात्कार करून फोडले महिलेचे डोळे
नागपूर - चार नराधमांनी वेकोलितील एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात घडली. या नराधमांनी पीडितेचे दोन्ही डोळे फोडून, दगडाने ठेचत तिच्या खुनाचा प्रयत्न केला. चौघेही आरोपी ट्रकचालक आणि वाहक असून, त्यांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कार्यालयापासून काही अंतरावरील अत्यंत निर्जनस्थळी बांबूपासून तयार केलेल्या शौचालयात पीडिता गेली असताना हा किळसवाणा प्रकार घडला. अर्ध्या तासानंतर एका वृद्ध ट्रकचालकामुळे तो उघडकीस आला. महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असून, तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
नराधम होते दडून
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तेथील कर्मचाºयांनी सर्वत्र शोधाशोध केली. दोघे जण ट्रकमध्ये दडून
असलेले त्यांना दिसले. त्यांचे शर्ट रक्ताने माखलेले होते. अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले होते.