संशयखोर पतीच्या त्रासामुळे महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:41 IST2018-08-17T22:40:15+5:302018-08-17T22:41:55+5:30

संशयखोर पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Woman suicides due to harassment | संशयखोर पतीच्या त्रासामुळे महिलेची आत्महत्या

संशयखोर पतीच्या त्रासामुळे महिलेची आत्महत्या

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिनी लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशयखोर पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रेखा शिवेंद्र मिश्रा (२८) असे मृत महिलेचे नाव आहे.
रेखाचा शिवेंद्रसोबत नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. हे दोघेही मूळचे रिवा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रोजगाराच्या निमित्ताने ते नागपुरात आले होते. येथे शिवेंद्र हा खासगी नोकरी करतो. संशयी वृत्तीचा शिवेंद्र नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. वडिलांकडून ५० हजार रुपये किंवा वाहन आणून देण्यासाठीही तिला छळत होता. त्याचा छळ असह्य झाल्याने बुधवारी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास रेखाने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला आरोपी पतीच कारणीभूत असल्याची तक्रार रेखाचे नातेवाईक श्रीनिवास भोलाराम दुबे (वय ४७, रा. गंगतिरा, जि. रिवा) यांनी नंदनवन ठाण्यात नोंदवली. त्यावरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.

 

Web Title: Woman suicides due to harassment