शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक, अमरावती जिल्ह्यातून घेतले ताब्यात

By नरेश डोंगरे | Updated: July 12, 2024 21:18 IST

चिमुकला सुखरूप पोहचला आईवडीलांच्या कुशित

नागपूर : सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात रेल्वे पोलिसांनी आज यश मिळवले. सूर्यकांता विश्वनाथ कोहरे (वय ४०) असे आरोपी महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्या तावडीतून चिमुकल्या बाळाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या कुशित सोपविले. महिला आरोपीला नागपुरात आणल्यानंतर रेल्वेचे उपअधीक्षक पांडूरंग सोनवणे आणि वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशिद यांनी आज रात्री पत्रकारांना या प्रकरणातील घडामोडींची माहिती दिली.

अमरावती जिल्ह्यातील पुसला (वरूड) येथे राहणाऱ्या सूर्यकांताने गुरुवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून ललिता आणि उमाकांत इंगळे (वय ३०) या दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. उमाकांतने दिलेल्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता ती नागपूर-वर्धा मेमू ट्रेनमध्ये बाळाला घेऊन बसल्याचे दिसून आले. हा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता आरोपी महिला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम जवळच्या वरूड रेल्वे स्थानकावर बाळाला घेऊन उतरताना ट्रेनच्या सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यामुळे पोलिसांनी वरूड गावातील नागरिकांना आरोपी महिलेचा फोटो दाखवून विचारपूस केली असता त्यांनी तिच्याबाबत पोलिसांना अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली.

त्यानुसार, आपल्याला ज्या वरूडला (पुसला) जायचे, ते हे वरूड नसल्याचे सूर्यकांताच्या लक्षात आल्यानंतर तिने वेगळीच शक्कल लढवली. पती खूप दारूडा असून, खायला देत नाही. रोज मारहाण करतो. त्यामुळे मुलाला घेऊन आली. आपल्याला अमरावती जिल्ह्यातील वरूडला जायचे आहे. मात्र, पुरेशी माहिती नसल्याने या वरूडमध्ये उतरली, असे सांगून सूर्यकांताने गावकऱ्यांची सहानूभूती मिळवत त्यांना मदत मागितली. त्यामुळे गावकऱ्यांनी तिला एकूण २५० रुपये जमवून दिले आणि वरूडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवूनही दिले. मदत मिळवल्यानंतर तिने नातेवाईकाला एक फोन लावून द्या, असे म्हणत तेथील एका व्यक्तीच्या फोनवरून पुसल्यात राहणाऱ्या एकाला फोन केला. शोधाशोध करीत आज सकाळी वरूडमध्ये पोहचलेल्या रेल्वे पोलिसांना ही माहिती कळाली. त्यामुळे पोलिसांनी त्या फोनधारक व्यक्तीकडून पुन्हा पुसल्यातील त्याच व्यक्तीच्या नंबरवर फोन केला. यावेळी सूर्यकांतानेच फोन उचलला. आपण सुखरूप गावात पोहचल्याचे तिने सांगितले. त्या आधारे पोलिसांचे दुसरे एक पथक पुसल्यात पोहचले अन् सूर्यकांताला ताब्यात घेतले. सायंकाळी तिला नागपुरात आणून अटक करण्यात आली.मातृत्वाने उसळी मारल्यानेच केला गंभीर गुन्हाआरोपी महिला सूर्यकांता मुळची मुलताई, बैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. तिला दोन मुली असून, त्यातील एकीचे लग्न झाले आहे. पतीचे निधन झाल्यामुळे तिच्या दुसऱ्या मुलीचा सांभाळ तिची मोठी मुलगी आणि जावई करतो. मोलमजुरी करताना सूर्यकांताची गवंडीकाम करणाऱ्या अक्षय बाबाराव आठनेरे (वय ३२) याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी दीड वर्षांपूर्वी मंदीरात लग्न केले. गेल्या आठवड्यात ते पुसला, वरूड (जि. अमरावती) येथे राहायला आले. सूर्यकांताचे ऑपरेशन झाले असल्यामुळे ती पुन्हा आई बणू शकत नाही. मुली आणि जावयांची संबंध तोडल्याने तिचे मातृत्व उसळी मारू लागले. त्याचमुळे तिने हा गंभीर गुन्हा केला. दरम्यान, अवघ्या २४ तासात या गुन्ह्याचा छडा लावून अपहृत बाळाला त्याच्या आईवडीलांच्या कुशित सोपविण्याची प्रशंसनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात आणि ठाणेदार मनीषा काशिद यांच्या नेतृत्वात एपीआय कविकांत चाैधरी, हवलदार संजय पटले, पुष्पराज मिश्रा, शिपाई अमोल हिंगणे, अली, रोशन मोगरे, अमित त्रिवेदी, प्रवीण, खंडारे, महेंद्र मानकर, चंद्रशेखर मदनकर, नीलेश अघम, विशाल शेंडे, सचिन गणवीर आदींनी बजावली.

 

टॅग्स :KidnappingअपहरणnagpurनागपूरAmravatiअमरावती