३० दिवसांत,१८५ निकाल

By Admin | Updated: December 24, 2014 00:39 IST2014-12-24T00:39:45+5:302014-12-24T00:39:45+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांंचे अवघ्या महिनाभरात १८५ निकाल जाहीर झाले आहेत. निकाल घोषित करण्यास विलंब लावण्यात येत असल्याबद्दल राज्यपालांनी

Within 30 days, 185 results | ३० दिवसांत,१८५ निकाल

३० दिवसांत,१८५ निकाल

नागपूर विद्यापीठ : परीक्षा विभागाने कसली कंबर
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांंचे अवघ्या महिनाभरात १८५ निकाल जाहीर झाले आहेत. निकाल घोषित करण्यास विलंब लावण्यात येत असल्याबद्दल राज्यपालांनी प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्याचाच परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठाकडून ८३५ अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा आयोजित करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ८४, दुसऱ्यात ३१३ व तृतीय टप्प्यात २७४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या.
आतापर्यंत पहिल्या टप्प्याचे २१, दुसऱ्यातील १५६ तर तिसऱ्या टप्प्यातील ९ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या चौथ्या टप्प्याच्या परीक्षा १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ११ दिवसांकरिता ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या होत्या हे विशेष.
पुढील आठवड्यात आणखी २०० अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्याचे परीक्षा विभागाचे प्रयत्न राहणार आहेत.
या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले आहे अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. उन्हाळी परीक्षांचे निकाल घोषित करण्यात विद्यापीठाला ४५ ते १२० दिवसांचा कालावधी लागला होता. यामुळे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले होते. (प्रतिनिधी)
निकालाअगोदरच परीक्षा अर्ज
दरम्यान, परीक्षा कार्यप्रणालीत आणखी एक मोठा बदल परीक्षा विभागाने केला आहे. यानुसार दोन, चार तसेच सहाव्या सत्राच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी परीक्षांसाठी आतापासूनच अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निकालांची प्रतीक्षा न करता विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात यावे असे निर्देश महाविद्यालये तसेच शैक्षणिक विभागांना देण्यात आले आहेत. सत्रप्रणालीत समानता यावी यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाळी परीक्षा सुरू करण्याचा परीक्षा विभागाचा मानस आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Within 30 days, 185 results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.