महायुती सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 05:50 IST2024-12-18T05:49:52+5:302024-12-18T05:50:21+5:30

विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा तांत्रिक आहे आणि त्याबाबत काय मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा करतो आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

winter session of maharashtra assembly 2024 aaditya thackeray said mahayuti govt should tell the people of the state who the home minister | महायुती सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

महायुती सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रच नाही तर कुठल्याही राज्यात कायदा व सुव्यवस्था सर्वांत महत्त्वाची असते. राज्यात नवीन सरकारचे गठण होताच, खुनाचे सत्र आणि सामाजिक परिस्थिती चिघळली आहे. अशावेळी गृहखात्याचा मंत्री असणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे, असा सवाल उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा तांत्रिक आहे आणि त्याबाबत काय मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा करतो आहोत.

 

Web Title: winter session of maharashtra assembly 2024 aaditya thackeray said mahayuti govt should tell the people of the state who the home minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.