हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता; निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 10:24 IST2025-11-03T10:23:59+5:302025-11-03T10:24:44+5:30

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिले संकेत

Winter session likely to be postponed by ten days Manpower shortage due to elections | हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता; निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता

हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता; निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे अधिवेशन ८ ते १० दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान यासंदर्भात संकेत दिले.

ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग दाटले आहेत. मंत्र्यांच्या अनेक बंगल्यांचे काम प्रलंबित आहे. १५० कोटींची बिले थकीत असल्याने ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नागपूरऐवजी मुंबईत अधिवेशनाची चर्चा सुरू आहे. मात्र, नागपूर करारानुसार विधिमंडळाचे एक सत्र नागपूरमध्ये घेणे बंधनकारक आहे. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक होईल. त्यात सरकारी यंत्रणा कामात असेल. त्यामुळे त्यानंतरच हिवाळी अधिवेशन घेणे शक्य होईल. याबाबत विचार सुरू आहे. मात्र, निर्णय झालेला नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ जेसीबीचालकांवर गुन्हे

उपराजधानीसह राज्यात अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून रस्ते वेडेवाकडे खोदून ठेवले जातात. याला प्रामुख्याने जेसीबी चालक जबाबदार असतात. निर्देशांचे पालन न करता ते मनमानी पद्धतीने रस्ते खोदून ठेवतात. त्याचा फटका जनतेला बसतो. त्यामुळे अशा जेसीबीचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले आहेत. सोबतच खोदकाम करणाऱ्या नागपुरातील सर्व संबंधित एजन्सीजची एक संयुक्त बैठक येत्या आठवड्यात घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

Web Title : चुनाव के कारण शीतकालीन सत्र दस दिन तक स्थगित होने की संभावना

Web Summary : स्थानीय चुनावों और कर्मचारियों की कमी के कारण नागपुर में महाराष्ट्र का शीतकालीन सत्र 8-10 दिन तक विलंबित हो सकता है। बकाया ठेकेदार बकाया और लापरवाह सड़क खुदाई भी चिंता का विषय है।

Web Title : Winter Session Likely Postponed Due to Election Staff Shortage

Web Summary : Maharashtra's winter session in Nagpur may be delayed 8-10 days due to local elections and staff shortages. Unpaid contractor dues and reckless road excavation are also concerns.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.