शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

हिवाळी अधिवेशन : आमदारांना घडवणारे विधिमंडळ ग्रंथालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:07 AM

आमदारांना त्यातही नवीन आमदारांना एक अभ्यासू आमदार बनविण्यात विधिमंडळ ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला आमदार घडवणारे ग्रंथालय असेही म्हटले जाते.

ठळक मुद्देविदर्भातील संशोधकांसाठीही मोठा आधार : दरवर्षी अभ्यासक व संशोधक घेतात लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. राज्याच्या विधिमंडळात पारित अनेक कायदे नंतर देशाने स्वीकारले आहेत.विधिमंडळातील व्यापक हिताचे निर्णय घेणारे मंत्री आणि तितकेच अभ्यासू सदस्य असलेल्या आमदारांमुळेच हे शक्य झाले आहे. परंतु या आमदारांना त्यातही नवीन आमदारांना एक अभ्यासू आमदार बनविण्यात विधिमंडळ ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला आमदार घडवणारे ग्रंथालय असेही म्हटले जाते.येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. दरम्यान आजपासून सचिवालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. विधिमंडळाचे ग्रंथालयही संशोधकांसाठी सज्ज झाले आहे. ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल बा.बा. वाघमारे यांनी या ग्रंथालयाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य १९६० पासून अस्तित्वात आले. १९६० पासून सुरू झालेल्या विधिमंडळाची सर्व कागदपत्रे ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ‘पीएच.डी.’करणाऱ्यांसाठी प्रत्येक संदर्भाची पुस्तके ग्रंथालयात आहेत. विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाजातील विविध विषयांवर दरवर्षी राज्यातील जवळपास ४० ते ४५ जण ‘पीएच.डी.’ करतात. म्हणजेच पाच वर्षांमध्ये जवळपास २२५ जण ‘राजकारण’ या विषयावरच ’डॉक्टरेट’ होतात. ‘पीएच.डी.’ करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, यवतमाळ, अमरावती, मराठवाडा आदींसह अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १९५२ पासून अस्तित्वात आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचे व संदर्भसुद्धा उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर देशातील विविध राज्यातील उच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचेही एकूण १२ लाखांच्या जवळपास कागदपत्रे (संदर्भ) विधिमंडळ ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ‘पीएच.डी.’ करणाऱ्यांना हवे तेवढे आणि हवे तेव्हा संदर्भ उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याची वेळच कुणावर येत नसल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.संशोधकांना फोनवरही परवानगीविधिमंडळ ग्रंथालयाचा लाभ आमदारांसह अभ्यासक व ‘पीएच.डी.’ करणाºया विद्यार्थ्यांनाही घेता येतो. नागपूर, विदर्भातीलही अनेक अभ्यासकांना मुंबईमध्ये येऊन याचा लाभ घेणे परवडणारे नसते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात नागपूरसह विदर्भातील संशोधकांना याचा लाभ घेता येईल. माहितीचे संदर्भ घेणे सोयीचे व्हावे यासाठी नागपूर व विदर्भातील अभ्यासकांना प्राधान्य दिले जाणार आहे. केवळ ‘पीएच.डी.’ करणारेच नव्हे तर संशोधक, विद्यार्थी कुणालाही संदर्भ हवे असल्यास त्यांना फोनवरसुद्धा परवानगी दिली जाईल. त्यांनी ९३२१०२०२७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही वाघमारे यांनी सांगितले.९७ आमदार नवीन२८८ विधानसभा सदस्य संख्याबळ असलेल्या राज्य विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत तब्बल ९७ आमदार हे प्रथमत:च निवडून आले आहेत. यंदा नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास नसल्याने चर्चेचा कालावधी वाढविण्याची शक्यता आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी तसेचविधिमंडळाच्या कामकाजासंदर्भातील जुन्या संदर्भाची माहिती होण्यासाठी नव्याने सभागृहात येणाºया ९७ आमदारांना या विधिमंडळ ग्रंथालयातील संदर्भाचा फायदा होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनlibraryवाचनालय