शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यातील सरपंच हत्याप्रकरणाच्या तपासात ‘एआय’चा वापर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By योगेश पांडे | Updated: December 16, 2024 16:43 IST

मुख्यमंत्र्यांची परिषदेत घोषणा : आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई होणारच

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत मांडण्यात आला. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणाच्या तपासात तंत्रज्ञान व आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडला होता. दानवे यांनी या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष असल्याचा मुद्दा मांडला. यावर बोलताना फडणवीस यांनी सरकारीच भूमिका स्पष्ट केली. सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. फरार आरोपींना शोधण्यावर भर देण्यात येत आहे. सीआयडीकडे हे प्रकरण देण्यात आले असून त्यांच्या ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्यात येईल. ज्या पोलिसांनी या प्रकरणात कामचुकारपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांवर नाहक अंगुलीनिर्देश होतोयावेळी फडणवीस यांनी राजकीय पक्ष व नेत्यांवर केलेल्या आरोपांवरदेखील भाष्य केले. हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जात असते. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे ज्यावेळी बोलले जाते, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतानादेखील त्यांच्याकडे कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो, असे फडणवीस म्हणाले. आरोपी कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा-धर्माचा आहे, कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे, अशा प्रकारचा विचार न करता घटनेत सहभागी असणार्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सBeedबीडsarpanchसरपंचnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन