शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 12:29 IST

सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

ठळक मुद्देनागपुरात उष्माघाताने ३५ मृत्यू

नागपूर : उपराजाधीन सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानामुळे नागपूरकर त्रस्त आहेत. उष्माघाताने नागरिकांचे जीव जात आहेत. आता काँग्रेसने याला राजकीय मुद्दा करण्याची तयारी चालवली आहे. नागपुरात उष्माघाताने ३५ जणांचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ही एकप्रकारे नैसर्गिक आपत्तीच आहे. सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

लोकमतशी चर्चा करताना पटोले म्हणाले, अतिवृष्टीने मृत्यू झाल्यास सरकार भरपाई देते. मात्र, उष्माघाताने मृत्यू झाल्यास भरपाई देण्यासाठी सरकारने कुठलेही नियम तयार केलेले नाहीत. उष्माघात ही सुद्धा नैसर्गिक आपत्तीच आहे. ऊन तापतेय म्हणून कुणी घरात बसू शकत नाही. उपजीविकेसाठी बाहेर पडून काम करावेच लागते. सरकारने या संदर्भात एक धोरण तयार करण्याची गरज आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करू, असेही पटोले यांनी सांगितले.

पटोले म्हणाले, नागपुरात एकाच दिवशी उष्माघाताने १७ जणांचा मृत्यू झाला. चंद्रपुरात शेकडो पक्ष्यां जीव गेला. ही आकडेवारी धक्कादायक आहे. असे असले तरी बाधितांना मदत मिळत नाही. सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला हवा. काँग्रेसचे पदाधिकारी उष्माघाताने झालेल्या मृत्यूची आकडेवारी गोळा करीत असून, आपण हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्यांच्याकडे उष्माघाताने झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही.

१७ प्रकरणे आली, ७ रद्द, ६ प्रलंबित

- महापालिकेच्या हीट ॲक्शन प्लॅनचे अध्यक्ष डॉ. विजय जोशी म्हणाले, यावर्षी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची १३ प्रकरणे समोर आली. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ही प्रकरणे ठेवण्यात आली. समितीने सात प्रकरणे रद्द केली, तर ६ प्रकरणांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्यामुळे प्रलंबित आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे महापालिकेला यासंदर्भात पावले उचलण्यास अडचण आली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेHeat Strokeउष्माघातDeathमृत्यू