पत्नीची हत्या आरोपीचा शोध सुरू
By Admin | Updated: May 3, 2014 16:47 IST2014-05-03T13:23:36+5:302014-05-03T16:47:55+5:30
पत्नीची गळा कापून हत्या केल्यानंतर फरार झालेला आरोपी आसिफ शेख अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पत्नीची हत्या आरोपीचा शोध सुरू
नागपूर: पत्नीची गळा कापून हत्या केल्यानंतर फरार झालेला आरोपी आसिफ शेख अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणार्या जाटतरोडीस्थित एका घरात बुधवारी सकाळी आसिफची पत्नी पूजा ऊर्फ अल्सिया हिचा मृतदेह आढळून आला होता. तिचा गळा कापलेला होता. तेव्हापासून आसिफचा शोध सुरू आहे. मात्र तो अद्याप गवसला नाही. दरम्यान घटनेच्या पूर्वी आसिफने पत्नी आणि तिच्या मित्राला धमकी देत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर पूजाची हत्या झाली. यासंदर्भात पोलिसांनी पूजाच्या कथित मित्राची चौकशी केली. त्याने पूजासोबत मैत्री असल्याची बाब मान्य केली आहे.
दहा महिन्यापूर्वी पूजाचा आसिफसोबत विवाह झाला होता. काही दिवसाने तिने आसिफच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. आसिफने नागपूरला यावे, असा पूजाचा आग्रह होता. ती दीड महिन्यापूर्वीच नागपुरात आली होती. वस्तीतील एका गुन्हेगाराशी तिची मैत्री होती. त्याच्या मदतीनेच पूजाने घर किरायाने घेतले असावे, असा संशय आसिफला होता. (प्रतिनिधी)