नशेत केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:17 IST2018-09-06T00:16:21+5:302018-09-06T00:17:29+5:30

पत्नीची हत्या करणारा आरोपी राज यादव याने नशेत वाद झाल्याने हत्या केल्याचे सांगितले आहे. सीताबर्डी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर करून १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.

Wife murdered in drunk condition | नशेत केली पत्नीची हत्या

नशेत केली पत्नीची हत्या

ठळक मुद्दे१० पर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीची हत्या करणारा आरोपी राज यादव याने नशेत वाद झाल्याने हत्या केल्याचे सांगितले आहे. सीताबर्डी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर करून १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.
यादव हा धरमपेठ येथील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क येथील सुलभ शौचालयात चौकीदार आहे. तो पत्नी चंद्रकलासोबत राहत होता. दोघांना दारूचे व्यसन होते. त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. १ सप्टेंबर रोजी रात्री दोघांमध्ये वाद झाला. यात यादवने काठीने तिला बेदम मारहाण केली. बेशुद्ध झाल्यावर तिला ओढत नेऊन सुलभ शौचालयाच्या पहिल्या माळ्यावरील खोलीत फेकून दिले. पहाटे ४ वाजता चंद्रकलाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तिचा मृतदेह पोत्यामध्ये भरून दुसऱ्या माळ्यावरील पाण्याच्या टाकीत फेकून दिला. यानंतर यादव सुलभ शौचालयातच काम करीत होता.
मृतदेहामुळे पाणी पुरवठा होत नसल्याने मंगळवारी सकाळी दुरुस्तीसाठी बोलावण्यात आलेल्या प्लंबरमुळे घटना उघडकीस आली. यादवला तात्काळ अटक करण्यात आली. यादवचे म्हणणे आहे की, १ सप्टेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे नशेत असताना त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात त्याने चंद्रकलाला मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.

Web Title: Wife murdered in drunk condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.