घरगुती भांडणातून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:09 IST2021-03-10T04:09:10+5:302021-03-10T04:09:10+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : घरगुती भांडणातून चिडलेल्या पतीने पत्नीच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. ही घटना ...

Wife murdered in domestic quarrel | घरगुती भांडणातून पत्नीचा खून

घरगुती भांडणातून पत्नीचा खून

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : घरगुती भांडणातून चिडलेल्या पतीने पत्नीच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभापूर शिवारात घडली असून, पाेलिसांनी आराेपी पतीस अटक केली आहे.

कांचन अभय येसकर (२६) असे मृत पत्नीचे तर अभय दिवाकर येसकर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी पतीचे नाव आहे. ते कुंभापूर, ता. माैदा येथील रहिवासी असून, त्यांची कुंभापूर शिवारात शेती आहे. दाेघेही गुरुवारी (दि. ४) त्यांच्या शेतात गेले हाेते. त्यांच्या शेतालगत अजय वडे (४०, रा. काेपरा, ता. माैदा) यांचे शेत आहे. दरम्यान, अजय वडे यांना सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास महिलेचा जाेरजाेरात ओरडण्याचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सालगड्याला घेऊन अभयच्या शेताकडे धाव घेतली.

त्या दाेघांनाही अभय हा त्याच्या पत्नीला मारहाण करीत असल्याचे आढळून आले. दाेघांनाही पाहताच अभयने त्यांना साल्यांनाे इकडे येऊ नका, नाही तर तुम्हालाही पाहून घेईन, अशी धमकी दिली. त्याच्या हाती कुऱ्हाड असल्याने दाेघेही काही अंतरावर थांबले. त्यातच अभयने कांचनच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार केले. ती जाेरात मेलाे अशी ओरडली आणि शांत झाली, अशी माहिती अजय वडे यांनी पाेलिसांना दिली. माहिती मिळताच माैदा पाेलिसांनी घटनास्थळ गाठून कांचनचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शिवाय, भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी अभय येसकर यास अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.

Web Title: Wife murdered in domestic quarrel