पत्नीचा पतीवर, प्रेयसीचा प्रियकरावर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:18 IST2019-05-19T01:16:03+5:302019-05-19T01:18:48+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पती(वय ३५)वर त्याच्या पत्नीने (वय ३४) बलात्काराचा आरोप लावला. तर, दोन वर्षांपासून सोबत ठेवून ठिकठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध त्याच्या प्रेयसीने बलात्काराची तक्रार दिली. मानकापूर ठाण्यात या दोन्ही प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

Wife on husband and fiancee on fiance rape alligation | पत्नीचा पतीवर, प्रेयसीचा प्रियकरावर बलात्काराचा आरोप

पत्नीचा पतीवर, प्रेयसीचा प्रियकरावर बलात्काराचा आरोप

ठळक मुद्देचर्चेला उधाण : मानकापुरात दोन गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पती(वय ३५)वर त्याच्या पत्नीने (वय ३४) बलात्काराचा आरोप लावला. तर, दोन वर्षांपासून सोबत ठेवून ठिकठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध त्याच्या प्रेयसीने बलात्काराची तक्रार दिली. मानकापूर ठाण्यात या दोन्ही प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
पत्नीच्या तक्रारीनुसार, तिचा हा दुसरा पती आहे. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करायचा आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शरीरसंबंध जोडायचा. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढत गेला अन् शुक्रवारी, १७ मे रोजी तिने पतीविरुद्ध मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून छळ करणे तसेच बलात्कार करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, याच महिलेविरुद्ध आता आरोपी बनलेल्या पतीने फसवणूक तसेच ५० लाख रुपयांच्या खंडणी वसुलीची तक्रार नोंदविल्याने आठ दिवसांपूर्वी तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी याप्रकरणी सदर महिलेविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस सावधगिरीने तपास करीत आहेत.
दुसरी तक्रार १७ वर्षीय प्रेयसीने केली. तिचे आकाश गजानन टाले (वय २२, रा. मानवसेवानगर) याच्यासोबत सप्टेंबर २०१८ पासून प्रेमसंबंध होते. आकाश झोमॅटोत फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. सप्टेंबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत त्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडले. आता मात्र त्याने तिच्यासोबत संबंध तोडले. लग्नालाही नकार दिला. त्यामुळे प्रेयसीने आकाशविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. तिने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आकाश टालेला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Wife on husband and fiancee on fiance rape alligation