पत्नीने केली दगाबाजी : घरातील रोख आणि दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 22:32 IST2021-04-02T22:30:28+5:302021-04-02T22:32:30+5:30

Wife cheated, crime news पत्नी आणि तिच्या मित्राने घरातील रोख आणि दागिने घेऊन पळ काढला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना लक्षात आल्यानंतर पीडित पतीने पोलिसांकडे धाव घेतली.

Wife cheated: taken away cash and jewelery in the house | पत्नीने केली दगाबाजी : घरातील रोख आणि दागिने लंपास

पत्नीने केली दगाबाजी : घरातील रोख आणि दागिने लंपास

ठळक मुद्दे पतीची पोलिसात धाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पत्नी आणि तिच्या मित्राने घरातील रोख आणि दागिने घेऊन पळ काढला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना लक्षात आल्यानंतर पीडित पतीने पोलिसांकडे धाव घेतली. संदीप बबन विश्वकर्मा (वय ३४) असे तक्रार करणाऱ्या पतीचे नाव आहे. ते संयुक्त अरब अमिरात येथे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करतात. अधूनमधून नागपूरला घरी येतात. पती परदेशात राहत असल्याची संधी साधून संदीपची पत्नी गुंजन (वय ३०) हिने तिचा मित्र गिरीश कटारा (रा. जयपूर, राजस्थान) याच्याशी संगनमत केले. पती घरी नसताना तिने घरातील रोख ४० हजार तसेच सोन्याचे दागिने असा सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज घेऊन सहा वर्षांच्या मुलीसह घरातून पलायन केले. २२ जानेवारी २०१९ ते १३ सप्टेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. दरम्यान, संदीप विश्वकर्मा सौदी अरबमधून परत आले असता त्यांना पत्नीची दगाबाजी लक्षात आली. त्यांनी तिची बरीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी मानत नसल्याचे पाहून शेवटी गणेशपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. संदीप विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी त्यांची पत्नी गुंजन तसेच तिचा मित्र गिरीश कटारा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Wife cheated: taken away cash and jewelery in the house