भाजीत हळद जास्त टाकल्यावरून पत्नीस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:15+5:302021-04-06T04:08:15+5:30
वेलतूर : भाजीमध्ये हळद जास्त का टाकली, या क्षुल्लक कारणावरून पतीने मारहाण करीत पत्नीला जखमी केले. शिवाय, आराेपी पतीने ...

भाजीत हळद जास्त टाकल्यावरून पत्नीस मारहाण
वेलतूर : भाजीमध्ये हळद जास्त का टाकली, या क्षुल्लक कारणावरून पतीने मारहाण करीत पत्नीला जखमी केले. शिवाय, आराेपी पतीने तिला मजुरीला जाते, ते पैसे मला दे अन्यथा तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना वेलतूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचाळ येथे शनिवारी (दि.३) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश डाेमाजी पंचबुधे (४०, रा. चिचाळ, ता. कुही) असे आराेपी पतीचे नाव असून, जयश्री सुरेश पंचबुधे (३२) असे जखमी महिलेचे नाव आहे. जयश्री ही स्वयंपाक करीत असताना तिच्या पतीने जेवण घेतले व ‘भाजीमध्ये हळद जास्त का टाकली’, या कारणावरून तिला शिवीगाळ करून ती पाेळ्या करीत असताना तिच्या हातातील बेलन हिसकावून लाकडी बेलनाने पत्नीच्या डाेक्यावर प्रहार करून तिला जखमी केले. शिवाय, ‘तू मजुरीला जाते, ते पैसे मला दे नाही तर तुला जिवाने मारून टाकणार’ अशी धमकीही तिला दिली. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी आराेपी पतीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार संजय पायक करीत आहेत.