शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

न्यायालयात पत्नीवर हल्ला

By admin | Published: April 07, 2016 2:57 AM

खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराने न्यायालयात पेशीदरम्यान पत्नी आणि पोलीस हवालदारावर खुनी हल्ला केला.

खुनाच्या आरोपीचे कृत्य : हवालदारावरही केला वार नागपूर : खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराने न्यायालयात पेशीदरम्यान पत्नी आणि पोलीस हवालदारावर खुनी हल्ला केला. जिल्हा न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. हुडको कॉलनी निवासी ३० वर्षीय संदेश ऊर्फ गोलू नाईक याने साथीदारांच्या मदतीने रूपेश ऊर्फ पप्पू काळे याचा १४ जानेवारी २०१४ रोजी खून केला होता. जरीपटका पोलिसांनी खुनाच्या आरोपात गोलूला अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात बंद आहे. पत्नी स्नेहा त्याला भेटण्यासाठी तुरुंगात जात होती. एक आठवड्यापूर्वी सुद्धा ती तुरुंगात भेटायला गेली होती. तेव्हा सुद्धा तो तिच्याशी व्यवस्थित बोलला नव्हता. मंगळवारी गोलूची न्यायालयात पेशी होती. तेव्हा स्नेहा चार वर्षाच्या मुलाला घेऊन त्याला भेटायला न्यायालयात आली होती. बुधवारी ती पुन्हा एकटीच गोलूला भेटायला आली होती. हवालदार देवेंद्र नगराळेसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गोलूला तुरुंगातून न्यायालयात आणले होते. दुपारी १२.३० वाजता गोलू सत्र न्यायाधीश ए.वी. दीक्षित यांच्या न्यायालयाबाहेर स्नेहा गोलूला भेटली. पती-पत्नी बोलत असल्याने पोलीस थोड्या बाजूला उभे झाले. सुरुवातीला गोलूने स्नेहासोबत सामान्यपणे चर्चा केली. परंतु अचानक तो तिच्यावर आरोप करू लागला. शिखातून चाकूसारखी लोखंडी पट्टी काढली आणि तिच्यावर वार करू लागला. प्रत्यक्षदर्शीनुसार तिच्या गळ्यावर केलेला पहिला वार चुकल्याने गोलूने दुसरा वार केला. तो तिच्या नाकाला लागला. दरम्यान आरडाओरड झाल्याने हवालदार देवेंद्र नगराळे व त्यांचे साथीदार धावले. त्यांनी गोलुला पकडण्याचा प्रयत्न केला. गोलूने देवेंद्रवरही हल्ला केला. देवेंद्रने साथीदारांच्या मदतीने गोलूवर नियंत्रण मिळविले.त्याला न्यायालयात सादर केल्यानंतर पोलीस चमू सदर ठाण्यात पोहचली.(प्रतिनिधी) तुरुंगातूनच आणला होता चाकू या घटनेमुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोलूने चाकूसारख्या लोखंडी पातीचा उपयोग केला होता. लोखंडी पातीला धारदार करून चाकू तयार केला होता. असे शस्त्र तयार करायला वेळ लागतो. गोलूची मंगळवारी पत्नीसोबत भेट झाली होती. ती बुधवारी पुन्हा येईल, याची त्याला माहिती होती. अशा परिस्थितीत तुरुंगातूनच त्याने चाकू आपल्या सोबत आणण्याची शंका आहे.