शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीच्या काळात साहित्यिक, इतिहासकार मौन का होते ?

By योगेश पांडे | Updated: June 25, 2025 19:30 IST

विनय सहस्त्रबुद्धे : कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून राईचा पर्वत करत काही साहित्यिकांकडून सरकार व प्रशासनाविरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र आणीबाणीच्या कालावधीत कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. स्वातंत्र्यानंतर देशासमोरील त्या सर्वात कठीण काळात संबंधित साहित्यिक व इतिहासकारांनी मौन का साधले होते असा सवाल उपस्थित करत त्यांना नक्कीच इतिहास प्रश्न विचारणार असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

आणीबाणीनिमित्त नागपुरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त ते नागपुरात आले होते. पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी त्या काळात घाबरलेल्या होत्या, त्यामुळे आपल्या अवतीभवती विश्वासपात्र लोकांना नेमण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांनी देशात आपल्या कुटुंबातील सत्ता कायम ठेवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणीमुळे भारताच्या लोकशाही वर कलंक लागले. कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटनांनी आणीबाणीचा विरोध केला असता लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्याबाबत कॉंग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.

खरगे निराधार बोलतातमल्लिकार्जुन खरगे टीका करताना बहुतांश वेळा निराधार बोलतात. आणीबाणीच्या काळात आम्ही अशी टीका केली असती, तर ती छापलीदेखील गेली नसती. त्यामुळे खरगे यांच्या टीकेला जास्त उत्तर देण्याची गरज नाही. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले. संविधानाच्या मुद्द्यांवर आमच्यावर विरोधकांकडून तथ्यहीन टीका करण्यात येते. मात्र याचा अर्थ आम्ही बचावात्मक पवित्रा घेतला आहे असा होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरेंनी केले होते देवरसांचे स्वागतयावेळी सहस्त्रबुद्धे यांनी आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उचलली गेल्यानंतर मार्च १९७७ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. दादर रेल्वे स्टेशनवर त्यांचा स्वागत खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. एका बाळासाहेबांचा स्वागत दुसऱ्या बाळासाहेबांनी करू नये असं बंधन नाही असे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

टॅग्स :nagpurनागपूर