शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

नागपूर विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:25 PM

बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२६ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले. याशिवाय अगोदर विद्यापीठाने निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज न करणाऱ्या ९८ तर ‘एलईसी’ची प्रक्रिया न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांमधील प्रवेश गोठविले होते. आता एकूण २५३ महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाला महाविद्यालयांमधून विरोध सुरू झाला आहे. नागपूर विद्यापीठात आजच्या स्थितीत ३५२ पैकी १५६ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. अशास्थितीत अनेक विभागांत तर नियमित शिक्षकांचीदेखील वानवा आहे. महाविद्यालयांना लावलेल्या नियमांनुसार त्या विभागांमध्येदेखील विद्यापीठाने प्रवेशबंदी लागू करायला हवी, असा सूर प्राचार्यांमध्ये आहे. जर विद्यापीठाने विभागांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याची अधिसूचना काढली आहे, तर मग महाविद्यालयांनादेखील ही परवानगी द्यायला हवी, अशी मागणीदेखील समोर येत आहे.विद्यापीठाच्या पोटात का दुखते?प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यापीठाचे हे पाऊल विद्यार्थीहिताचे नसल्याची टीका केली आहे. मुळात स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम आणि नियमित शिक्षक यांची सांगड घालणे अतिशय कठीण बाब आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम नागपुरात आले आहेत. या अभ्यासक्रमांना अनुदानित तुकड्यांमधील पात्र शिक्षक शिकवत आहेत. असे असताना विद्यापीठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ एका व्यक्तीसोबत असलेल्या वैमनस्यामुळे शेकडो महाविद्यालये व हजारो विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठ प्रशासन खेळखंडोबा करत असल्याचा त्यांनी आरोप लावला.विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाहीमहाविद्यालये गप्प का?यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता, नियमांनुसारच महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. अनुदानित महाविद्यालयांवर ही कारवाई झालेली नाही. विनाअनुदानित महाविद्यालये व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांवर नियमांनुसारच कारवाई झाली आहे. जर त्यांनी शिक्षकांची भरती केली तर त्यांच्यावरील बंदी उठविण्याला आमची काहीच हरकत नसेल. जर विद्यापीठाने चुकीचे पाऊल उचलले आहे, तर मग एकाही महाविद्यालयाकडून आक्षेपाचे पत्रदेखील का आले नाही, असा प्रश्न डॉ. काणे यांनी उपस्थित केला.विद्यापीठाच्या विभागांमधील रिक्त पदांची स्थितीसंवर्ग                      मंजूर पदे      भरलेली         पदे रिक्त पदेप्राध्यापक                ५३                २५                 २८सहयोगी प्राध्यापक  ८९                 ४७                ४२सहायक प्राध्यापक १९२               ११९                ७३शिक्षक समकक्ष        १८               १०                  ०८एकूण                      ३५२             १९६               १५६

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर