छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का ? विधानपरिषदेत सदस्यांकडून सवाल उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:28 IST2025-12-13T17:15:28+5:302025-12-13T17:28:03+5:30
Nagpur : सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.

Why is the history of Chhatrapati Shivaji in only 68 words? Questions raised by members in the Legislative Council
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे आराध्यदैवत असताना नवीन पिढीपर्यंत त्यांचे कार्य हवे त्या प्रमाणात नेण्यास 'सीबीएसई 'कडून दिरंगाई करण्यात येत आहे. 'सीबीएसई'च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांतच का आहे, असा सवाल विधानपरिषदेत सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला.
सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शिक्षण विभाग अतिशय कमी शब्दांचा इतिहास हा महाराजांचा अवमान असल्याचे किशोर दराडे म्हणाले. युट्यूबवरून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे नाटक, मजकूर हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी 'सीबीएसई'च्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतिहासाची माहिती वाढविण्यासाठी एनसीआरटीशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे नाटक युट्यूबवरून हटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेदेखील सांगितले.
शिवाजी महाराज अस्सल चरित्र साधन खंडनिर्मिती
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने प्रसारित व्हावा, याबाबत राज्य सरकार कटिबद्ध असून, यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार आहे. शिवरायांवरील चरित्र खंड निर्मिती करणार असल्याचे आश्वासन भोयर यांनी दिले. त्याचप्रमाणे शाळांमध्ये शिवचरित्रांचे वाचन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.