शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

का झाला 'त्या' चार मातां मृत्यू ? गूढ वाढले; २५ औषधी तपासणीच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:21 IST

Nagpur : लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत एकही माता मृत्यूची नोंद नसताना, अचानक ऑक्टोबर महिन्यात प्रसूती झालेल्या चार मातांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऑक्टोबर महिन्यात प्रसूती झालेल्या चार मातांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. रुग्णालयातील २५ औषधी तपासणीच्या फेऱ्यात आली आहेत. यासाठी खुद्द हॉस्पिटलने या औषधी तपासणीसाठी अन्न व औषधी प्रशासनाला (एफडीए) सोमवारी पत्र दिले.

लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत एकही माता मृत्यूची नोंद नसताना, अचानक ऑक्टोबर महिन्यात प्रसूती झालेल्या चार मातांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने स्वतः या मृत्यूची नोंद जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात केल्यानंतर, तातडीने डॉ. श्रीराम गोगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली.

समितीने ३१ ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलला भेट दिली. प्रसूतीसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया गृहातील जीवाणू संसर्गाची तपासणी करण्यासाठी स्वॅब घेण्याचे निर्देश दिले. यात शस्त्रक्रिया गृहातील उपकरणांपासून ते टेबलचा वरचा भाग, प्रकाश दिवे आणि भिंती यांसारख्या विविध पृष्ठभागांवर जीवाणू किंवा सूक्ष्मजीव आहेत की नाहीत याची तपासणी होणार आहे. या शिवाय, मृत मातांना दिलेल्या औषधांची तपासणी करण्याची सूचनाही समितीने दिल्या. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाने दोन दिवस उशिरा का होईना ३ ऑक्टोबर रोजी 'एफडीए'ला पत्र लिहून तब्बल २५ औषधांचे नमुने तपासण्याची विनंती केली. या औषधांच्या गुणवत्तेतून मृत्यूचे कारण समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'एफडीए'ची मयार्दा; चारच औषधांचे नमुने घेणार?

हॉस्पिटलने २५ औषधांच्या तपासणीची विनंती केली असली तरी, अन्न व औषध प्रशासनाने यावर तांत्रिक अडचण उपस्थित केली आहे.'एफडीए'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही चारपेक्षा जास्त औषधांची तपासणी करू शकत नाही.त्यामुळे, उद्या मंगळवारी 3 'एफडीए'चे पथक २५ पैकी नेमक्या कोणत्या ४ औषधांचे नमुने तपासणीसाठी निवडते आणि या नमुन्यांच्या अहवालातून या दुर्दैवी मृत्यूंमागील सत्य समोर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mystery Deepens: Four Maternal Deaths at Nagpur Hospital Under Investigation

Web Summary : Four maternal deaths in a Nagpur hospital spark investigation. Twenty-five drugs are under scrutiny by FDA after a sudden rise in fatalities. The hospital requested the drug testing to determine the cause, but FDA faces limitations on samples tested.
टॅग्स :nagpurनागपूरMedicalवैद्यकीयHealthआरोग्य