शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

पेटलेली रेल्वे वॅगन कुणाची विकेट घेणार? रतलाम ते ताडालीपर्यंत चाैकशी

By नरेश डोंगरे | Updated: February 20, 2025 21:17 IST

वॅगनची कॅप उघडी, गॅसकिटही खराब...

नागपूर : ट्रेन आणि स्थानकावरील शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घालू पाहणारी 'पेटलेली वॅगन' कुणाकुणाची विकेट घेणार, या प्रश्नाने संबंधितांची धाकधुक वाढविली आहे. दुसरीकडे 'त्या' वॅगनचे सिल, नटबोल्ट गायब होते, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक चाैकशीत उघड झाली आहे.

१६ फेब्रुवारी, रविवारी दुपारी ३:४५ वाजता रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या मालगाडीच्या वॅगनमधून अचानक आगीचा भडका उडाला होता. क्षणातच आगीने राैद्ररुप धारण केल्यामुळे फलाटावरचे शेड जळाले. त्यावेळी तेलंगणा एक्स्प्रेस अगदी बाजुलाच उभी होती. आगीचे लोळ पाहून तेलंगणातील तसेच फलाटावरील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याने त्यांनी एकाचवेळी गाडीतून उतरण्यासाठी धावपळ सुरू केली होती. काहींनी चक्क उड्याही घेतल्या. परिणामी रेल्वे स्थानकावर एकच हल्लकल्लोळ निर्माण झाला होता. सुदैवाने यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफ, जीआरपी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना केल्याने आगीपासून प्रवाशांचा बचाव झाला अन् चेंगराचेंगरीसारखे भयंकर आक्रितही टळले.वॅगनमधील पेट्रोल डिझेलचा उडालेला भडका तेलंगणा एक्सप्रेसच्या दारापर्यंत पोहचला असता तर काय घडले असते, याची कल्पना आल्याने शहारलेल्या रेल्वेच्या मुख्यालयाने घटनेची गंभीर दखल घेतली असून, या घटनेला कुणाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे, त्याची चाैकशी सुरू केली आहे.१० अधिकाऱ्यांची समिती - चाैकशी करण्यासाठी मध्य रेल्वेचे एडीएमई राही तसेच एडीएसओ सरकार यांच्यासह रेल्वेचे एकूण पाच अधिकारी तसेच इंडियन ऑईलचे पाच अशा १० अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने ज्या ठिकाणाहून पेट्रोल डिझेल भरून मालगाडी निघाली, त्या रतलामपासून नागपूर ते तडालीपर्यंतची पाहणी करून अनेकांची चाैकशी केली आहे.

पाईप खराब, नटबोल्टही गायबपेट घेणाऱ्या मालगाडीच्या वॅगनवरच्या झाकणाचे सिल खुले होते. गॅसकिट आणि पाईप कव्हर खराब होता. नटबोल्टही गायब होते, अशी धक्कादायक माहिती चाैकशीतून पुढे आली आहे. या अक्षम्य हलगर्जीपणाला कोण-कोण दोषी आहे, ते आता शोधले जात आहे.

या गंभीर प्रकाराला जे कुणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होईल. दुसरे म्हणजे, खबरदारीचा उपाय म्हणून यापुढे रेल्वेस्थानकावर ऑईल टँकर (वॅगन) आणली जाणार नाही. अजनी यार्डात क्रू चेंज केला जाईल.विनायक गर्ग, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर 

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारतfireआगnagpurनागपूर