भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्या नावांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:13 IST2024-12-16T08:12:44+5:302024-12-16T08:13:47+5:30

चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्यामुळे आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील याची चर्चा सुरू झाली आहे.

who will be the bjp state president ravindra chavan and sanjay kute names in race | भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्या नावांची चर्चा

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्या नावांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्यामुळे आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले रवींद्र चव्हाण आणि डॉ. संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. 

प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. कोकणात भाजपला मोठे यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. तेदेखील फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचे ठरले तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाईल. 

जळगाव जामोदचे पाचवेळचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आता चर्चेत आहे. ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. ते कुणबी समाजाचे (बहुजन) आहेत. बावनकुळे हे तेली समाजाचे (बहुजन) आहेत आणि त्यांच्या जागी बहुजन समाजालाच संधी द्यावी असे ठरले, तर कुटे यांचे नाव प्रामुख्याने असेल.  

...तर तोपर्यंत बावनकुळेच प्रदेशाध्यक्ष 

भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा दिला जाईल. मात्र, दुसरा तर्क असाही आहे की, जे. पी. नड्डा यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्यात आले आहे. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रातही वापरला गेला, तर बावनकुळे हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील.

या नावांचाही होऊ शकतो विचार  

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. विधान परिषदचे सदस्य राम शिंदे हे धनगर समाजाचे आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाले नाही, तर प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. तेही फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. मंत्रिपदाची संधी न मिळू शकलेले सुधीर मुनगंटीवार यांचे पुनर्वसन कसे होते या बाबत उत्सुकता असेल. 


 

Web Title: who will be the bjp state president ravindra chavan and sanjay kute names in race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा